Sun, Mar 24, 2019 04:46होमपेज › Ahamadnagar › आजी-नातवाचा खाणीत पडून झाला दुर्दैवी मृत्यू

आजी-नातवाचा खाणीत पडून झाला दुर्दैवी मृत्यू

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:39AMशिर्डी : प्रतिनिधी

सावळीविहिर खुर्द येथे खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आजी व नातवाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तर नातीला वाचवण्यात यश आले. तिची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर येथील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सावळीविहिर परिसरात राहणार्‍या लिलाबाई आण्णासाहेब आहिरे (46, रा. सावळीविहिर खुर्द), त्यांच्या मुलीचा मुलगा सुमित अनिल बागुल (15, रा. अंगणगाव, येवला) व दुसर्‍या मुलीची कन्या अनुष्का अरुण शिंगाडे (8, रा. ब्राम्हणगाव, ता. कोपरगाव) हे मंगळवारी दुपारी धुणे धुण्यासाठी जवळच्याच खाणीमध्ये गेले होते. दरम्यान, आजी लिलाबाई, नातू सुमित व अनुष्काचा पाय घसरल्याने ते खाणीच्या पाण्यात पडले. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला असता तिथे असणार्‍या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिकडे धाव घेऊन सर्वांना बाहेर काढले. या तीनही आजी-नातवांना साईबाबा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता लिलाबाई व सुमितला मृत घोषित करण्यात आले. तर  अनुष्कावर उपचार सुरू आहेत.