Thu, Jun 20, 2019 00:29होमपेज › Ahamadnagar › मुलाकडून आईची ९ लाखांची फसवणूक

मुलाकडून आईची ९ लाखांची फसवणूक

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:51AMनगर : प्रतिनिधी

पोटच्या मुलाने आईची 9 लाख रुपयांची फसवणूक करून विश्‍वासघात केला. सदर रकमेची मागणी केली असता त्याने आई व बहिणींना जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्वप्निल शिवाजी कोथिंबिरे (रा. कोकणवाडी, जेऊर बायजाबाई, ता. नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुनंदा शिवाजी कोथिंबिरे (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोथिंबिरे यांचे एडीसीसी व बँक ऑफ महाराष्ट्राच्या जेऊर शाखेत खाते आहे. ऑगस्ट 2017 व ऑक्टोबर 2017 या महिन्यांमध्ये त्यांनी विश्‍वासाने सह्या करून मुलगा स्वप्निल याच्याकडे धनादेश दिले. त्याने खात्यातून 21 लाख रुपये काढले. त्यातील 12 लाख रुपये त्याने आई सुनंदा कोथिंबिरे यांना दिले व उर्वरीत 9 लाख रुपये नंतर देतो, असे सांगितले. काही दिवसानंतर आईने पुन्हा मुलगा स्वप्निल याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने पैसे न देता आई सुनंदा, बहीण प्राजक्ता निलेश मेहत्रे, प्रियंका शिवाजी कोथिंबिरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुनंदा कोथिंबिरे यांच्या फिर्यादीवरून मुलगा स्वप्निल कोथिंबिरे याच्याविरुद्ध 9 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान 420, 406, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळवदे हे करीत आहेत.