होमपेज › Ahamadnagar › खासदार गांधींच्या बंगल्याचे ९ फूट अतिक्रमण

खासदार गांधींच्या बंगल्याचे ९ फूट अतिक्रमण

Published On: Feb 26 2018 1:11PM | Last Updated: Feb 26 2018 1:11PMअहमदनगर : प्रतिनिधी 

कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या रुंदीकरणात रस्त्यातील खासदार गांधी यांचा बंगला ९ फूट अतिक्रमणात असल्याचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात दिला आहे. यावर १४ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

खा. गांधी यांच्या कंपाउंडचे अतिक्रमण काढले गेले नाही, असा दावा तक्रारदार विनोद अमोलकचंद गांधी यांनी केला होता. त्यांनी महापालिकेकडे दाद मागितल्यानंतर संबंधित अतिक्रमणावर कारवाई झाली नसल्याचे सांगून त्यांनी नगरविकास विभागाकडेही तक्रार केली होती. पण, तेथेही दाद न मिळाल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्‍यान, खासदार गांधी यांच्या बंगल्याचे कंपाउंड अतिक्रमणात आहे की नाही, हे ठरविण्यासाठी त्याचे मोजमाप करण्याचे मनपाद्वारे सांगण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही होऊन आज (दि.२६) न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. यात ९ फूट बाय ० एवढे अतिक्रमण करण्यात आल्याचा अहवाल मनपाने दिला असल्याचे तक्रारदार विनोद गांधी यांनी सांगितले. यावर आता १४ मार्चला सुनावणी होणार आहे.