Fri, Jul 19, 2019 23:02होमपेज › Ahamadnagar › ८७१ कोटींची कर्जमाफी                 

८७१ कोटींची कर्जमाफी                 

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 12:10AMनगर : प्रतिनिधी

राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 462 शेतकर्‍यांना 871 कोटी 44 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत 1 मे 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी या वाढीव कालावधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेमार्फत पात्र 2 लाख 10 हजार 395 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 614.23 आणि व्यापारी, ग्रामीण व खाजगी बँकामार्फत पात्र 37 हजार 061 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 257.21 कोटी असे एकूण 2 लाख 47 हजार 462 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 871.44 कोटी कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. शासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात  जिल्ह्यामध्ये 24 जुलै 2017 ते 22 सप्टेंबर 2017 अखेर एकूण 3 लाख 34 हजार, 920 ऑनलाईन अर्ज आपले सरकार पोर्टलवर अपलोड करण्यात आले. त्यापैकी आधार कार्ड संलग्नित ऑनलाईन अर्ज अपलोड केलेल्या शेतकर्‍यांची संख्या 3 लाख 15 हजार, 100 तर आधार कार्ड शिवाय अर्ज अपलोड करणारांची संख्या 19 हजार 820 इतकी होती. याशिवाय, ग्रीन यादी प्राप्त झाल्यानुसार संबंधित लाभार्थ्यांना कर्जमाफी रक्कम वर्ग कऱण्यात आली. 

त्यात, जिल्हा बँकेकडील या यादीत असणार्‍या 2 लाख, 69 हजार 946 लाभार्थ्यांना 882.17 कोटी आणि व्यापारी बँकेतील 57 हजार 221 लाभार्थ्यांना 414.53 कोटी रुपये मिळणार आहे. सध्या जिल्हा बँकेला त्यापैकी 614.23 कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली असून, या संपूर्ण रकमेचे वितरण 2 लाख 10 हजार 395 लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. 

व्यापारी बँकेस प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या 414 कोटी 53 लाख रकमेपैकी 37 हजार 61 लाभार्थ्यांना 257 कोटी 21 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम संबंधितांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश संबंधित बँकांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नमूद केले.