Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Ahamadnagar › ७७ गावांत ग्रामपंचायत रणधुमाळीस प्रारंभ

७७ गावांत ग्रामपंचायत रणधुमाळीस प्रारंभ

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 23 2018 11:26PMनगर : प्रतिनिधी

माहे जून ते सप्टेंबर 2018 मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.जिल्ह्यातील  कान्हूरपठार, बारागाव नांदूर, चितळी, लोणी व्यंकनाथ, मुकिंदपूर, वडगाव गुप्‍ता, ब्राम्हणी व देसवंडी आदींसह 77 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, 27 मे 2018 रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात 77 गावांतील राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे.

जिल्हाभरातील 77 ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाची अंतिम यादी  नुकतीच जाहीर झाली आहे.या ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी जाहीर झाली असून, यावर हरकती देखील मागविल्या आहेत. मे महिन्यात जून व जुलै महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही ग्रामपंचायतींची मुदत संपण्यास तब्बल तीन महिन्यांचा अवधी बाकी असतानाच आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजविला आहे.

अकोले तालुक्यातील घोटीसह 10, संगमनेर तालुक्यातील घारगावसह दोन, कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका, सुरेगावसह नऊ, श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर,दिघीसह पाच, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, देसवंडी, ब्राम्हणी आदींसह अकरा, नेवासा तालुक्यातील मुकिंदपूरसह पाच, शेवगाव तालुक्यातील गोळेगाव,लाडजळगावसह तेरा,पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी,चिंचोडीसह सात, जामखेड तालुक्यातील मुंजेवाडीसह दोन, पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार,वाडेगव्हाणसह पाच, नगर तालुक्यातील वडगाव गुप्‍ता, राहाता तालुक्यातील चितळी आदींसह जिल्हाभरातील 77 ग्रामपंचायतींच्या 27 मे रोजी निवडणुका होणार आहेत.त्यामुळे या गावांतील राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे.

तालुकानिहाय ग्रा.पं. संख्या 

अकोले 10, संगमनेर 2, कोपरगाव 9, श्रीरामपूर 5, राहाता 1, राहुरी 11, नेवासा 5, नगर 1, पारनेर 5, पाथर्डी 7, शेवगाव 13, कर्जत 5, जामखेड 2, श्रीगोंदा 1.

निवडणूक कार्यक्रम
निवडणूक नोटीस 
प्रसिध्द- 27 एप्रिल 2018,
अर्ज दाखल करण्यास 
प्रारंभ-7 मे 2018,
शेवटची तारीख- 12 मे 
अर्जांची छाननी-14 मे
माघारीची तारीख-16 मे 
चिन्ह वाटप -16 मे 
मतदान - 27 मे 
मतमोजणी 28 मे 

 

Tags : ahamadnagar, ahamadnagar news,  Gram Panchayat, election,