Thu, Jul 18, 2019 21:34होमपेज › Ahamadnagar › समृद्धी मार्गासाठी 70 टक्के भूसंपादन 

समृद्धी मार्गासाठी 70 टक्के भूसंपादन 

Published On: Apr 21 2018 12:58AM | Last Updated: Apr 20 2018 11:24PMकोपरगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील दहा गावांतून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी 70 टक्के भूसंपादन झाले आहे. जे राहिले ते मूल्यांकन वादात अडकले आहेत. 1920 च्या आधी देवस्थानांना इनामी जमिनी देण्यात आल्या. त्या कसून त्यातून येणार्‍या उत्पन्नातून देवासाठी दिवाबत्ती करण्याची योजना होती. त्याचे ट्रस्ट होणे गरजेचे होते पण ते न घडल्याने अशा जमिनींचे व्यवहारही वादात आहेत. त्याची रक्कम थेट न्यायालयात जमा करणार असल्याचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुका समन्वय समितीची बैठक आ. स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. त्यात या रस्त्यासंदर्भातील वाद उपस्थित करण्यात आला. मुस्लिम वक्फ बोर्ड 1995 मध्ये अस्तित्त्वात आले. त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही रस्ता भूसंपादनाची रक्कम दिली जाणार नाही.  चांदेकसारे-कोकमठाण परिसरात तसेच अन्य गावांत या देवस्थानांच्या जमिनी आहे. त्याची रक्कम आपल्याला मिळावी, असे अनेकांनी दावे केले आहेत.  आदिवासी बांधवांना देखील अशाच पद्धतीने गायरान वनजमिनी देण्यात आल्या आहेत. त्यांच्याबाबतही असेच वाद निर्माण झाले आहेत.

Tags : Ahmadnagar, 70, percent, land, acquisition, Samruddhi, route