Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात रस्त्यांसाठी ६६ कोटी!

जिल्ह्यात रस्त्यांसाठी ६६ कोटी!

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 25 2018 1:03AMनगर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सन 2017-18 या वित्तीय वर्षात जिल्ह्यातील 23 रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी 66 कोटी रूपये खर्चाच्या कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. एकूण 112 किलोमीटर लांबीची ही कामे असून, त्यांची पाच वर्षे नियमित देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी 2.93 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर व ग्रामविकास विभागाच्या अटी-शर्तींस अधिन राहून ही कामे करावी लागणार आहेत.

तालुकानिहाय कामांची अंदाजित रक्‍कम व पाच वर्षे देखभाल दुरूस्तीची अंदजित रक्‍कम कंसामध्ये पुढीलप्रमाणे : अकोले तालुका- करंडी ते फोफसंडी रस्ता 2 कोटी 49 लाख 87 हजार रूपये (11.07 लाख रूपये). वाघदरी ते पैठण रस्ता 2 कोटी 46 लाख 93 हजार रूपये (10.95 लाख रूपये) व घोडसरवाडी ते बिताका रस्ता 2 कोटी 49 लाख 85 हजार रूपये (11.07 लाख रूपये). जामखेड तालुका- साकत पिंपळवाडी कोल्हेवाडी रस्ता 4 कोटी 9 लाख 58 हजार रूपये (18.18 लाख रूपये) व राज्यमार्ग 57 ते शिकारेवस्ती रस्ता 76 लाख 73 हजार रूपये (3.40 लाख रूपये). कर्जत तालुका-चांदा खुर्द ते खुरंगेवाडी रस्ता 1 कोटी 27 लाख 53 हजार रूपये (5.64 लाख रूपये) व राशीन ते काळेवाडी रस्ता 3 कोटी 94 लाख 33 हजार रूपये (17.46 लाख रूपये). 

कोपरगाव तालुका-टाकळी ब्राह्मणगाव ते नाटेगाव रस्ता 3 कोटी 81 लाख 69 हजार रूपये (16.92 लाख रूपये). नगर तालुका- डोंगरगण ते चाफेवाडी रस्ता 2 कोटी 46 लाख 45 हजार रूपये (10.93 लाख रूपये), आलमगीर ते मोरेवस्ती रस्ता 1 कोटी 57 लाख 65 हजार रूपये (7 लाख रूपये) व राज्यमार्ग क्र.5 ते तपोवन रस्ता 3 कोटी 15 लाख 58 हजार रूपये (14 लाख रूपये). नेवासा तालुका- तेलकुडगाव, पाचुंदा, माका ते महालक्ष्मी हिवरे रस्ता 4 कोटी 40 लाख 55 हजार रूपये (19.54 लाख रूपये) व वडाळा बहिरोबा ते म्हाळसा पिंपळगाव कौठा रस्ता 2 कोटी 79 लाख 16 हजार रूपये (12.36 लाख रूपये). 

पारनेर तालुका- चिंचोली फाटा, पिंपरी जलसेन ते निघोज रस्ता 4 कोटी 93 लाख 40 हजार रूपये (21.85 लाख रूपये). पाथर्डी तालुका- माणिकदौंडी ते जाटदेवळा रस्ता 4 कोटी 13 लाख 72 हजार रूपये (18.33 लाख रूपये) व तिसगाव, शिरापूर ते घाटशिरस रस्ता 2 कोटी 54 लाख 32 हजार रूपये (11.29 लाख रूपये). राहाता तालुका- रामपूरवाडी ते एकरूखे रस्ता 2 कोटी 71 लाख 90 हजार रूपये (12.07 लाख रूपये) व राहाता, रांजणगाव खुर्द गणेशनगर रस्ता 2 कोटी 49 लाख 15 हजार रूपये (11.04 लाख रूपये). राहुरी तालुका- कोल्हार खुर्द ते पाटीलवाडी रस्ता 2 कोटी 68 लाख 66 हजार रूपये (11.92 लाख रूपये). 

संगमनेर तालुका- पिंपारणे ते घोडझाप कोळवड 1 कोटी 32 लाख 45 हजार रूपये (5.87 लाख रूपये). शेवगाव तालुका-सोनविहीर ते राज्यमार्ग क्र.50 साठी 2 कोटी 69 लाख 2 हजार रूपये (11.93 लाख रूपये) व कोपरे वडुले खुर्द ते ढोरजळगाव रस्ता 5 कोटी 11 लाख 45 हजार रूपये (22.70 लाख रूपये). श्रीरामपूर तालुका- गोंडेगाव ते मातुलठाण रस्ता 1 कोटी 68 लाख 63 हजार रूपये (7.48 लाख रूपये).