Wed, Jul 08, 2020 06:59होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : संगमनेरमधील ५५ वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू 

अहमदनगर : संगमनेरमधील ५५ वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू 

Last Updated: May 29 2020 3:51PM
कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या पोहोचली ५ वर   

संगमनेर :पुढारी वृत्तसेवा

संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात राहणाऱ्या आणि फालुदा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ५५ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असता आज शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. आता संगमनेरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ५ वर जाऊन पोहोचली आहे   

संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णसंख्या संगमनेर तालुक्यात आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यात आज मदिनानगर भागातील दोन रुग्णांची भर पडली आहे. याच मदिनानगर परिसरात राहत असणाऱ्या आणि फालूदा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीला गुरुवारी श्वसनाचा त्रास होत होता. त्य़ामुळे त्याला संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याला लक्षणे अधिक तीव्र दिसत असल्यामुळे त्या रुग्णास तत्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांना दिला.  

घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात त्या रुग्णास नेण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्या व्यक्तीला तत्काळ अहमदनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब तपासणी पाठविण्यात आला असता आज शुक्रवारी त्याचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले.