Mon, Apr 22, 2019 03:59होमपेज › Ahamadnagar › ५२ तोळे सोन्याच्या गोफची शिर्डीत चोरी

५२ तोळे सोन्याच्या गोफची शिर्डीत चोरी

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 07 2018 12:58AMशिर्डी : प्रतिनिधी 

ठाणे शहरातील डोंबिवली भागात राहणारा एक साईभक्त शिर्डीत साई दर्शनासाठी आले असता शिर्डीतील द्वारावती भक्तनिवासातून सुमारे 52 तोळ्याचा सोन्याचा गोफ व रोख रक्कम 40 हजार रुपयांची चोरी झाली असल्याचा दावा केला आहे. परंतु याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

ठाणे शहरातील डोंबिवली भागात राहणारे हेमंत पाटील हे शिर्डीत दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी शिर्डीतील साई संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासमधील खोली क्र.143 देण्यात आली होती. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या खोलीचा दरवाजा उघडा असताना फोनवर बोलत होते. त्या दरम्यान त्यांच्या खोलीत लटकवलेल्या पॅन्टमधून अज्ञात व्यक्तीने 52 तोळे सोन्याचा गोफ व 40 हजार असा मुद्देमाल लंपास केला. 

याबाबतची चर्चा पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे याना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी चौकशी केली आहे. मात्र, या भक्ताने कोणतीही तक्रार शिर्डी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.