Tue, Nov 20, 2018 01:12



होमपेज › Ahamadnagar › चौंडीतील गोंधळप्रकरणी ५१ अटकेत 

चौंडीतील गोंधळप्रकरणी ५१ अटकेत 

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:49AM



जामखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात गोंधळ घालून पोलिसांना धक्काबुक्की, मारहाण व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 51 जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सर्वांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने 35 आरोपींची सोमवार (दि.4) पर्यंत, तर 16 जणांना मंगळवार (दि.5) पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

यावेळी पाच पोलिस जखमी झाल्याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल गहिनीनाथ बबन यादव यांनी दिली आहे. त्यावरून जामखेड पोलिस ठाण्यात सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे (रा. वरूळ ता. भूम, जि.उस्मानाबाद) यांच्यासह 35 ते 40 आरोपीं विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल शामसुंदर जाधव यांनी दाखल केली आहे.

त्यावरून बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष इंद्रकुमार भिसे यांच्यासह 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कट कारस्थान करून पालकमंत्री राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना, आरक्षणाची पत्रके काढून गोंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिस कर्मचारी संदीप पवार यांना जिवे मारण्याच्य उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे, अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये 51 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना काल (दि.1) कर्जत न्यायालयात हजर केले असता 35 आरोपींना सोमवारपर्यंत तर 16 जणांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .

अटक केलेल्यांमध्ये सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे (रा. वरूळ ता. भूम, जि. उस्मानाबाद), काकासाहेब अप्पाराव मार्कंड (रा. सोनगिरी, ता. भूम), नागनाथ नरूटे (रा. आवारपिंपरी ता. परांडा), गणेश कारंडे (रा. खांबेवाडी ता. करमाळा), बालाजी गोयकर (रा. सुकटा-भुवनवाडी ता. भूम), हरिश्‍चंद्र धायगुडे (रा. हांगेवाडी, ता. श्रीगोंदा), सुभाष देवकाते (रा. साडेसांगवी, ता. भूम), नानासाहेब पवार (रा. कारंजा, ता. परांडा), बाळू गडदे (रा. नारायणनगर  ता. मानवत), अरूण शेरकर (रा. भूम), दीपक थोरात (रा. लहुजीनगर, ता. भूम),शिवाजी वाडीकर (रा. मुक्रमाबाद, ता.मुखेड), दिलीप जाधव (रा. आसुली मुंडेकर वस्ती, ता. भूम), राजकिरण योगकर (रा. आरसुली, ता. भूम), आण्णा कोळेकर (रा. भेापलगाव ता. भूम), भागवत घोडके (रा. बिरोबाची वस्ती, भोपलगाव, ता.भूम), शंकर  तरटे (रा. नारायणनगर, मानवत), लहू गायकवाड (रा. गोगलगाव ता. भूम), संदीप खराडे (रा. परांडा), अक्षय रणदिवे (रा. परांडा), शिवशंकर सोलापुरे (रा. भूम), युवराज हुबे (रा. विट, ता. भूम), अमोल सुरवसे (रा. लक्ष्मीनगर, ता भुम), प्रवीण ठोंगे (रा. गांधीनगर, ता. बार्शी), विनोद वाणी (रा. आगळगावरोड, ता. बार्शी),  तुकाराम बरकडे (रा. देवाग्रा ता. परांडा), समाधान हाडुळे (रा. विट, ता. भूम), दत्तात्रय कन्हे (रा. सदाशिवनगर, ता माळशिरस), रोहन गाडे (रा. आलमप्रभुनगर ता. भूम), दत्ता महारनोर (रा. शिवाजीनगर ता. भूम), अंजिर महारनवर (रा.दिघी ता.कर्जत), दीपक महारनवर (रा.दिघी ता.कर्जत ) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पोलिस कॉन्स्टेबल शामसुंदर जाधव याच्या फिर्यादीवरून इंद्रकुमार भिसे (रा. थिटेवाडी, ता. कर्जत), किशोर मासाळ (रा. सूर्यानगरी ता. बारामती), निती मासाळ (रा.झारगडवाडी, ता.बारामती), संतोष तावरे (रा. अंदोबावाडी , पोस्ट माळेगाव, ता. बारामती), सचिन गोरडकर (रा. भावडी ता. श्रीगोंदा), लहू घोडे (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर), शशिकांत चासकर (रा. भावडी, ता. पारनेर), शुभम ढवण (रा. निघोज, ता. पारनेर), राहुल साबळे (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर), राजेंद्र कोळेकर (रा.सूर्यानगर, ता.बारामती), विशाल सूळ (रा. खडकी ता. करमाळा), भागेश महारनवर (रा. दिघी, ता. कर्जत), कोंडीबा महारनवर (रा. दिघी, ता.कर्जत), सूरज खोमणे (रा. कोर्‍हाळे खुर्द, ता. बारामती), संदीप मासाळ (रा.झारगडवाडी, ता. बारामती), अनिल मासाळ (रा. काटेवाडी, ता. बारामती), श्रीकृष्ण बजंगे (रा. बजरंगवाडी, ता. कर्जत)  यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.