Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Ahamadnagar › तलवारी बाळगणार्‍या 5 जणांना अटक

तलवारी बाळगणार्‍या 5 जणांना अटक

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 11 2018 11:48PMनगर : प्रतिनिधी

कँप पोलिसांनी भिंगारमधील गौतमनगर, केकती परिसरात छापे टाकून तलवारी बाळगणार्‍या 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार धारदार तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. काल (दि. 11) ही मोहीम राबविण्यात आली.अटक केलेल्यांमध्ये सुनील राजाराम शेळके (वय 41, रा. केकती, ता. नगर), गोरखनाथ मारुती भिंगारदिवे (वय 33), दीपक बाळू धिवर (वय 36), कानिफनाथ मारुती भिंगारदिवे (वय 35), गणेश पांडुरंग भिंगारदिवे (वय 21, सर्व रा. गौतमनगर, भिंगार) यांचा समावेश आहे. गौतमनगर परिसरातील काही आरोपींच्या घरात धारदार शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍याकडून समजली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक गजान करेवाड, जयश्री काळे, संजय कवडे, कर्मचारी गायकवाड, राजेंद्र सुद्रिक, डी. एन. शिंदे आदींच्या पथकाने शुक्रवारी (दि. 11) गौतमनगरमध्ये छापासत्र राबविले. त्यात चौघांकडे दोन धारदार तलवारी सापडल्या. त्यांनी हॉटेल संस्कृतीचे मालक शेळके याच्याकडे आणखी तलवारी असल्याचे सांगितले. त्यावरून त्याच्याकडून आणखी दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.याप्रकरणी कँप पोलिस ठाण्यात 5 जणांविरुद्ध भारतीय हत्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक करेवाड हे करीत आहेत.

मोबाईल चोरांची टोळी पकडली

कँप पोलिसांनी मोबाईल चोरी करणारी तिघांची टोळी पकडून त्यांच्याकडून 5 महागडे मोबाईल हॅण्डसेट हस्तगत केले आहेत. अटक केलेल्यांमध्ये योगेश दुर्वेश साठे (वय 23, रा. डेअरी फार्म, सैनिकनगर, भिंगार), कुणाल ऊर्फ सोहम राजू भिंगारदिवे, वसंत रामचंद्र भिंगारदिवे (दोघे रा. जुना राजवाडा, घासगल्ली, भिंगार) यांचा समावेश आहे. सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.