Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Ahamadnagar › मुळा धरण सुरक्षेसाठी ३० यांत्रिक बोटी !

मुळा धरण सुरक्षेसाठी ३० यांत्रिक बोटी !

Published On: May 19 2018 1:29AM | Last Updated: May 19 2018 12:07AMराहुरी : प्रतिनिधी 

मुळा धरण सुरक्षिततेबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. धरण तटाच्या रक्षणासाठी 30 यांत्रिक बोटींची मागणी सरकारकडे करण्यात आली. तसेच बंदूकधारी 3 पोलिस कायमस्वरूपी मुळा धरणावर कायम करण्यात आले. 

मुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी मुळा धरणाच्या सुरक्षिततेचा मुद्यावरून पाटबंधारे, पोलिसांचा अहवाल घेत उचित उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. 25 लाख लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या मुळा धरणाच्या पाण्यात विषारी औषध टाकून मासेमारी होत असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर मुळा धरणच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील धरणाच्या ठिकाणी सतर्कता घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

पाटबंधारे विभागाकडून धरण सुरक्षिततेचा अहवाल सादर केल्यानंतर 30 यांत्रिकी बोटी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच कायमस्वरूपी बंदूकधारी पोलिसांचे संरक्षण मिळावे, अशी मागण ीकेली.मुख्यमंत्र्यांनी 3 बंदूकधारी पोलिस कायमस्वरूपी मुळा धरणावर नेमण्याचा आदेश देत यांत्रिकी बोटी संदर्भाचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. 
दरम्यान, मुळा धरणावर सुरक्षितता वाढविण्यात आल्याने अवैध मासेमारीसह इतर अवैध कृत्यांनाही बंदी आली आहे. पोलिस प्रशासनाची गस्त रात्रंदिवस धरणस्थळावर सुरूच असून पाटबंधारे विभागाकडून उचित उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. 

उशिरा सुचलेलं शहाणपण..! 

‘पुढारी’मध्ये 30 एप्रिल रोजी धरणात विषारी मासेमारीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केला होता. दरम्यान, मुळा पाटबंधारे विभागाने प्रारंभी विषारी मासेमारीचा प्रकार घडला नसल्याचे सांगितले होते. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने विषारी मासेमारीची दखल घेतल्यानंतर पाटबंधारे विभाग जागे झाले आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने उशिरा का होईना घेतला आहे.