Sun, Jul 21, 2019 08:30होमपेज › Ahamadnagar › शाळा दुरुस्तीसाठी ३० कोटींची मागणी; संस्थानकडून ग्रीन सिग्नल

शिर्डीत शिवसेनेचा एल्गार 

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:46AMशिर्डी : प्रतिनिधी 

अहमदनगर जिल्हा परिषदेतंर्गत येणार्‍या नादुरुस्त शाळांच्या खोल्या बांधण्यासाठी साईबाबा संस्थानने 30 कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगर तालुका पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकार्‍यांकडे  निवदेनाद्वारे केली आहे. दरम्यान, साई संस्थानने हा निधी मंजूर केला असून, लवकरच शासन मान्यतेनंतर तो तात्काळ वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी जि. प. सदस्य संदेश कार्ले, माजी खा. दादा पाटील शेळके, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, घनशाम शेलार, शरद झोडगे आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील निंबोडी गावातील शाळेची भिंत पावसाने पडली होती. त्यात काही चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता तर काही मुले जखमी झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साई संस्थानला अशा नादुरुस्त शाळांच्या खोल्यांचे नवीन बांधकाम करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी चर्चा झाली होती. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून, निंबोडीसारखी दुर्घटना घडू नये, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साई संस्थानने तो निधी तात्काळ जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, यासाठी दोन दिवसांपूर्वी चिमुरड्यांसह नगर येथून शिर्डीकडे पायी दिंडी निघाली होती. यात रतडगाव व देहरे या शाळांमधील चिमुरडेही सहभागी झाली होती. शुक्रवारी सकाळी ही दिंडी साई संस्थानच्या साई अतिथी सभागृहाजवळ पोहोचली होती. त्यानंतर त्यांनी साई संस्थानच्या मुख्याधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेत त्यांना अशा आशयाचे निवेदन दिले. 

यावर अग्रवाल म्हणाल्या, साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने हा ठराव मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यातील 10 कोटींच्या मंजुरीसाठी न्याय विधी खात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या संदर्भात जि. प. मुख्याधिकारी यांनाही माहिती कळविली होती. मात्र, न्याय व विधी खात्याची मंजुरी मिळाल्यानंतरच निधी मिळणार आहे.