Sun, Jul 21, 2019 10:30होमपेज › Ahamadnagar › तीन लाख अकरा हजारांना म्हैस खरेदी!

तीन लाख अकरा हजारांना म्हैस खरेदी!

Published On: Jun 04 2018 1:02AM | Last Updated: Jun 03 2018 11:01PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

एकीकडे दुधाचे दर कोसळत असतानाही नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे भरणार्‍या जनावरांच्या बाजारात एका बागायतदाराने तब्बल 3 लाख 11 हजार रुपये मोजून म्हशीची खरेदी केली. म्हशीच्या विक्रीतील हा उच्चांक मानला जात आहे.

देशभरात प्रसिद्ध असलेल्या या जनावरांच्या बाजारात अमर शेख या म्हशीच्या व्यापार्‍याने एक म्हैस राजकोटहून विकत आणली होती. म्हशीला आणण्यासाठी साधारण 20 हजार रुपये खर्च आला. घोडेगावच्या बाजारात ही म्हैस भानसहिवरे येथील बागायतदार सयाजी ढवाण यांनी खरेदी केली. खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर या म्हशीची बाजारातून वाजतगाजत मिरवणूकही काढण्यात आली. हत्तीसारख्या दिसणार्‍या या म्हशीला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

दिवसाला 20 किलो सरकी पेंड, 10 किलो पशुखाद्याचा खुराक चार ते पाच कोटींची उलाढाल : गुजरात, कर्नाटक, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आदी भागातील व्यापारी घोडेगावला म्हशींसाठी येत असतात. सुमारे 300 व्यापारी या व्यवसायात असून, आठवड्याला चार ते पाच कोटींची उलाढाल होते. सर्वसाधारणपणे म्हशीचे वजन 900 किलोपर्यंत असते व 8 ते 20 लिटर दूध देतात. तीन लाखांना खरेदी केलेली म्हैस इतर म्हशींच्या तुलनेत खूपच सरस आहे.