Fri, Nov 16, 2018 10:55होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

अहमदनगर : अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Published On: Jan 20 2018 1:21PM | Last Updated: Jan 20 2018 1:21PMअहमदनगर : प्रतिनिधी

नगर - पुणे रस्त्यावर चारचाकी गाडी आणि दुचाकीची धडक होऊन तीन जण जागीच ठार झाले. केडगाव येथे आज दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला.

या अपघातातील  एक मयत श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील, एक सावेडी उपनगर येथील असल्याचे समजले. परंतु, त्यांची नावे स्पष्ट होऊ शकले नाही. तर अद्याप एका मृताची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार हंडाळ यांच्यासह कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.