Mon, May 27, 2019 08:40होमपेज › Ahamadnagar › जि.प.च्या 27 अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या

जि.प.च्या 27 अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:57PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागात काम करत असलेल्या 27 अधिकार्‍यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी या बदल्या केल्या.जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रियेत पाहिल्या दिवशी सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा व कृषी विभाग या विभागातील अधिकार्‍यांच्या  बदल्या करण्यात आल्या. सोमवारी सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. काल मंगळवारी प्राथमिक शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.

काल प्राथमिक शिक्षण विभागातील पाच विस्तार अधिकारी, व एका केंद्रप्रमुखाच्या बदल्या झाल्या. पशु संवर्धन विभागातील पाच सहायक पशुधन विकास अधिकारी व 3 पशुधन पर्यवेक्षक अशा एकुण जणांच्या बदल्या करण्यात आल्या. महिला व बालकल्याण विभागातील सात पर्यवेक्षिकांच्या बदल्या झाल्या. यात 6 बदल्या समानीकरणातून तर एक बदली प्रशासकीय करण्यात आली.आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या जवळपास 600 बदल्या काल (दि. 15) दुपारी चारच्या सुमारास सुरु करण्यात आल्या. या बदल्यात कर्मचार्‍यांची संख्या मोठी असल्याने रात्री उशिरापर्यंत बदल्यांची प्रक्रीया सुरु होती. त्यात काही बदल्या समुपदेशनाने तर काही ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहेत. या बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सदस्य राजेश परजणे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदिप सांगळे, पशुसंवर्धन अधिकारी सुनिल तुंबारे आदी सहभागी झाले होते.