Mon, Feb 18, 2019 07:30होमपेज › Ahamadnagar › विजेचा शॉक बसून १८ शेळ्यांचा मृत्यू

विजेचा शॉक बसून १८ शेळ्यांचा मृत्यू

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 06 2018 11:19PMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

वादळामुळे शेळ्यांच्या गोठ्यात वीजप्रवाह उतरल्याने शॉक लागून 18 शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल (दि.6) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. वनकुटेच्या कामगार तलाठ्यांनी पंचनामा केला आहे.
वनकुटे (ता. पारनेर) परिसरात काल वादळ झाले. यात गोठ्यात वीजप्रवाह उतरल्याने सुरेश जनार्दन साळवे यांच्या मालकीच्या 15 शेळ्या, तर पांडुरंग प्रभाकर पावडे यांच्या मालकीच्या तीन शेळ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर वनकुटेचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण शेळके व कामगार तलाठी बी. व्ही. सोबले यांच्याशी तातडीने संपर्क करून पंचनाम केला आहे. पंचनाम्यानुसार 18 शेळ्यांची बाजार भावाप्रमाणे 1 लाख 66 हजार रुपये किंमत आहे.

पंचनाम्यासाठी सरपंच झावरे, उपसरपंच बाळासाहेब गागरे, अर्जुन कुलकर्णी, दीपक खामकर यांनी पंचनामा करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. पंचनामा पारनेर तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. साळवे व पावडे यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, असे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे यांनी सांगितले.