Sat, Sep 22, 2018 00:57होमपेज › Ahamadnagar › नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या १७ टँकरला मंजुरी

नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या १७ टँकरला मंजुरी

Published On: Apr 20 2018 11:25AM | Last Updated: Apr 20 2018 11:25AMनगर : प्रतिनिधी

उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने जिल्हयात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. याबाबत नागरिकांनी पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी केली होती. त्याला मंजूरी देत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या १७ टँकर पुरवले जातील असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील १३ व पारनेर तालुक्यात ४ टँकरला मंजुरी देण्यात आली आहे.  नव्याने हजर झालेल्या जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मंजुरीअभावी प्रलंबित असलेल्या  टँकरच्या प्रस्तावांची माहिती घेवून मंजुरी दिली. याबाबतचे आदेश देण्यात आले असून, लवकरच या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होतील.