होमपेज › Ahamadnagar › नगरसेवकांना 15 लाखांचा विकास निधी!

नगरसेवकांना 15 लाखांचा विकास निधी!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या अंदाजपत्रकावर सुरु झालेली चर्चा अवांतर विषयांवरच भरकटली. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या वृक्ष गणना, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची कार्यवाही, नगरसेवक निधीसाठी रोख तरतुदी आदी विविध विषयांवरच तब्बल 4 तास चर्चा झडली. वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करणे, चालू व पुढील वर्षाच्या नगरसेवक निधीसाठी रोख तरतूद करुन नगरसेवकांना प्रभागातील विकासकामांसाठी प्रत्येकी 15 लाखांची तरतूद करण्याचे आदेश महापौर सुरेखा कदम यांनी दिले.

बुधवारी (दि.28) तहकूब करण्यात आलेली अंदाजपत्रकीय सभा काल (दि.29) दुपारी 1 वाजता सुरु झाली. मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी अंदाजपत्रकाचे वाचन सुरु केल्यानंतर महसुली जमा बाजूतील सर्वसाधारण कर या पहिल्याच लेखाशीर्षातील तरतुदीवर आक्षेप घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांत सर्वधारण कराची वसुली 14 कोटींपेक्षा अधिक झालेली नाही. अंदाजपत्रकात मात्र चारपट अधिक 56 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नगरसेवक गणेश भोसले, कैलास गिरवले, बाबासाहेब वाकळे, संपत बारस्कर, सागर बोरुडे, अनिल शिंदे आदींनी या विषयावर जाब विचारला. मात्र, या लेखाशीर्षावर चर्चा अंतिम होण्यापूर्वीच इतर विषयांवर चर्चा सुरु झाली.

रखडलेली वसुली, शास्ती माफीच्या विषयांवर प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर अधिकारी, कर्मचारी अपुरे असल्यामुळे अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे नगरसेवक कुमार वाकळे, गणेश भोसले यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर वसुली विभाग प्रमुख झिने यांनी ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. 

Tags : Ahmadnagar, Ahmadnagar News, 15 lakh, development, fund, corporators!


  •