Thu, Jul 18, 2019 20:45होमपेज › Ahamadnagar › अपघातात जळगावचे ११ पोलिस जखमी

अपघातात जळगावचे ११ पोलिस जखमी

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 10 2018 11:15PMनेवासा : प्रतिनिधी 

नगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ झालेल्या कंटेनर व पोलिस वाहनाच्या अपघातात जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे 11 पोलिस कर्मचारी जखमी झाले.  केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या कर्मचार्‍यांना बंदोबस्तासाठी नगरला रवाना करण्यात आले होते. हे कर्मचारी नगरहून जळगावकडे परतत असताना मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मंगळवारी (दि.10) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ पोलिस वाहन (एमएच 19 सी.वाय- 0376) व कंटेनर (सी.जी. 07 सी.ए.  3485) यांच्यात झालेल्या अपघातात 11 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.

पोलिस वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे 17 पोलिस कर्मचारी दि.7 एप्रिल रोजी नगर येथे बंदोबस्त कामी आले होते. मंगळवारी सकाळी जळगावकडे निघाले होते. यामध्ये अमोल भोसले, मनोज पाटील, सागर पाटील, विजय बच्चाव, अशोक मोरे, महेंद्र उमाळे, किरण मोरे, मनोज तडवी, शामराव उखलभील, प्रदीपकुमार चव्हाण, चालक हेमंत पाटील हे जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी जखमी कर्मचार्‍यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. 

Tags : nagar, nagar news, Jalgaon accident, 11 police, injured,