Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Ahamadnagar › तालुक्याचा १०० कोटींचा निधी हरवला?

तालुक्याचा १०० कोटींचा निधी हरवला?

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:36AM

बुकमार्क करा
कोळपेवाडी : वार्ताहर  

तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी 100 दिवसांत 100 कोटी निधी आणल्याच्या घोषणा करून नेहमीप्रमाणे पेपरबाजी केली होती. पण आज  झगडे फाटा-वडगाव पान रस्त्यासह कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहिल्यास 100 कोटी तर सोडाच पण एक कोटीचा सुद्धा निधी तालुक्यात कुठे आल्याचे दिसत नसून  कोपरगावचा 100 कोटीचा निधी हरविला तर नाही ना? असा प्रश्‍न कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी उपस्थित केला आहे. 

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिकार्‍यांनी कृषी व पणन महामंडळाकडे बाजार तळाच्या सुशोभीकरणासाठी निधी मागणी केली होती. महामंडळाने या मागणीचा सकारात्मक विचार करून चांदेकसारे ग्रामपंचायतीला 25 लाखांचा निधी मंजूर केला. नुकताच हा निधी ग्रामपंचायतील प्राप्त झाला असून या  निधीतून बाजारतळ सुशोभिकरणाच्या कामाच्या शुभारंभ काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू होन होते. यावेळी सभापती अनुसया होन, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, काकासाहेब जावळे, माजी संचालक डॉ. गोरक्षनाथ रोकडे,

आज कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हे समजेनासे झाले आहे. झगडे फाटा-वडगाव पान रस्त्यासह सर्वच रस्त्याची अवस्था पाहून तर आता असे वाटायला लागले की, या रस्त्यावर जो टोलनाका सुरु होता तो आजही सुरु असायला हवा होता का? असा मिस्कील सवाल केला. यावरून कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा कारभार कसा चालू आहे हे  तालुक्याच्या जनतेला कळेनासे झाले आहे.

समृद्धी महामार्गाच्या बाबतीत काही शेतकर्‍यांवर अन्याय झाला असून त्यांच्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करून त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत चांदेकसारे गावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या बंधार्‍याचा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून या कामाला सुद्धा लवकरच सुरुवात होणार असल्याचे  काळे यांनी सांगितले. चांदेकसारे बाजारतळाचे संपूर्णपणे सुशोभीकरण करण्यात येणार असून यामध्ये 50 बाय 12 फुटाचे नवीन चार ओटे, संपूर्ण जुन्या व नवीन ओट्यवर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. कार्यक्रमास राहुल रोहमारे, माजी सरपंच मतीन शेख, लाला होन, भीमा होन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नारायण होन यांनी मानले.