Sat, Jul 20, 2019 02:49होमपेज › Ahamadnagar › लिलावातून मिळाले १० लाख!

लिलावातून मिळाले १० लाख!

Published On: Jun 30 2018 1:14AM | Last Updated: Jun 30 2018 12:00AMसुपा : वार्ताहर

पारनेर तालुक्यात सुपा पोलिस ठाण्यात गेल्या दहा वर्षांपासून अनेक वाहने पडून होती. सन 2010 च्या आधी सुप्याचा कारभार पारनेर पोलिस ठाण्यांतर्गत चौकीमार्फत चालत होता. तेव्हापासून महामार्गवर बेवारस वाहने मिळून येत होती. अखेर सर्व गाड्यांचा लिलाव 26 जून रोजी दुपारी करण्यात आला. या लिलावातून  शासनाला दहा लाखांची रक्‍कम मिळाली आहे. 

नगर-पुणे महामार्गाशेजारी सुपा पोलिस ठाण्याची स्थापना मे 2010 साली करण्यात आली होती. मात्र जागेची अडचण भासू लागल्याने औद्योगिक वसाहतीत नव्याने पोलिस ठाण्याची इमारत बांधून कामकाज सुरळीत झाले. मात्र जुन्या पोलिस ठाण्यात बेवारस गाड्यांचा खच पडलेला होता. सर्व कंपन्याच्या 76 मोटारसायकली, चारचाकी 7 वाहने व एक कंटेनरचा यात समावेश होता. सन 2013 मध्ये वाडेगव्हाण शिवारात पाच कंटेनर भरून अनधिकृत चंदन साठा पोलिसांनी पकडला होता. त्यातील सर्व आरोपी पारनेर तालुक्यातील होते. कंटेनर मालकाचा शोध लाऊन न्यायालयामार्फत कंटेनर देण्यात आले होते.

त्यातील एक कंटेनर बेेवारस राहिल्यामुळे तो पोलिस ठाण्यात पडून होता. पोलिस प्रशासनाने या बेवारस वाहनांचा लिलाव केला. जिल्ह्यातील 36 व्यापार्‍यांनी त्यात सहभाग नोंदविला. हा लिलाव काल (दि. 28) दुपारी नागरिकांसमोर जाहीररित्या करण्यात आला. श्रीरामपूर भागातील राजू शहा यांनी दहा लाख रूपांयाना लिलाव घेतला. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार तुकाराम काळे, नागरिक उपस्थित होते. बेवारस वाहनांच्या लिलावामुळे जुन्या पोलिस ठाण्याचा श्‍वास मोकळा होणार आहे.पोलिस ठाणे औद्योगिक वसाहतीत गेल्यामुळे जुने पोलिस ठाणे ओस पडले आहे.नव्याने शुशोभिकरण करून ते वापरात आणावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.