Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Ahamadnagar › केडगाव प्रकरण : १० शिवसैनिक पोलिस ठाण्यात हजर

केडगाव प्रकरण : १० शिवसैनिक पोलिस ठाण्यात हजर

Published On: Jun 01 2018 1:30PM | Last Updated: Jun 01 2018 1:30PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर घडलेल्या दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले शिवसेनेचे १० कार्यकर्ते आज (दि.१) स्वतःहून कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. अटकेची कारवाई पूर्ण करुन त्यांना दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह ११ जण स्वतःहून हजर झाले होते. त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. त्यानंतर आज आणखी १० शिवसैनिक हजर झाले आहेत. संग्राम शेळके, अनिल सातपुते, मुकेश गावडे, सागर गायकवाड, अंगद महानोर, नयन गायकवाड, नितीन चोभे, शुभम परदेशी, नरेश भालेराव, मनोज चव्हाण आदींचा यात समावेश आहे.

दुहेरी हत्याकांडानंतर केडगावात सुमारे 4-5 तास पोलिसांना वेठीस धरून त्यांच्यावर दगडफेक, धक्काबुक्की करून वाहनांची तोडफोड केली होती.