Tue, May 21, 2019 22:25होमपेज › Ahamadnagar › कार दरीत कोसळून १ ठार

कार दरीत कोसळून १ ठार

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 10 2018 1:15AMसंगमनेर : प्रतिनिधी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारी कार नवीन माहुली शिवारात खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. 

संजय मधुकर साळवे (45, रमाबाईनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे) असे अपघातातील मयताचे नाव आहे, सयाजी बाबूराव वाळुंज व सचिन बाळू मुठे (दोघे रा. सद‍्गुरूनगर, भोसरी, पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

शनिवारी (दि.8) हे तिघे इको कारमधून (क्र.एमएच 14 - एफसी 1487) देवदर्शनासाठी श्रीरामपूर येथे आले होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास संगमनेरमार्गे ते कारमधून पुण्याच्या दिशेने जात होते. जुन्या एकल घाटाच्या नवीन माहुली शिवारात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती खोल दरीत कोसळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने   आजूबाजूच्या ग्रामस्थांनी लगेच त्या दिशेने धाव घेत कारमधील जखमींना बाहेर काढले. या अपघातात संजय साळवे यांना जबर मार लागल्याने त्यांचा  जागीच मृत्यू झाला. सयाजी वाळुंज व सचिन मुठे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.  क्रेनच्या साहाय्याने दरीत कोसळलेली कार बाहेर काढण्यात आली.