Wed, Jul 15, 2020 23:39होमपेज › Ahamadnagar › १९ लाखांचा कलश शनीचरणी

१९ लाखांचा कलश शनीचरणी

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 23 2018 11:15PMसोनई : वार्ताहर 

अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे 19 लाख रुपये किंमतीचा सोने व चांदी असणारा कलश शनीचरणी अर्पण करण्यात आला. 510 ग्रॅम सोने व 4290 ग्रॅम चांदी असणारा हा कलश देवाचरणी अर्पण करण्यात आला आहे.मात्र, दान करणार्‍या भक्ताने आपले नाव सांगितले नाही. सायंकाळच्या महाआरतीनंतर हा कलश चौथर्‍यावर लावण्यात आला.

या शनीभक्ताचा शनैश्वर देवस्थानच्या वतीने विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी जनसंपर्क कार्यालयात सन्मान केल. देवस्थानच्या वतीने विश्वस्तांनी त्यांचा शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला.

सत्काराला उत्तर देतांना या भक्ताने सांगितले की, शनी दर्शनाने नेहमी एक समाधान मिळते व ऊर्जा निर्माण होत असते. मी गेल्या 15 वर्षांपासून शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी येत आहे. देवस्थानने शनीभक्तांना अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच अनेक सामाजिक कामात हे देवस्थान अग्रेसर असल्याचे दिसत आहे. 

यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त रावसाहेब बानकर, भागवत बानकर, दीपक दरंदले, उप कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.