Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात ३२ गोवंशांची मुक्तता

संगमनेरात ३२ गोवंशांची मुक्तता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी 

शहरातील मदिनानगर भागात बेकायदा चालणार्‍या कत्तलखान्यावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या सुमारे 1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 32 गोवंशीय वासरांची मुक्तता केली. तसेच 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 1100 किलो गोमांस असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

शहरातील मदिनानगर भागात एका बेकायदा चालणार्‍या कत्तलखान्यावर कत्तलीसाठी गोवंशीय वासरे बांधली असल्याची गुप्त माहिती खबर्‍यामार्फत शहर पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांना समजली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे इस्माईल शेख, बाळासाहेब अहिरे, गोरक्ष शेरकर, रमेश लबडे, सागर धुमाळ यांना छापा टाकण्याचे आदेश दिले. 

पोलिसांनी  मदिनानगर भागातील एका कत्तलखान्यावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना कत्तलीसाठी निर्दयीपणे बांधलेली 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 32 गोवंश वासरे आढळली. ती वासरे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कत्तलीतून मुक्तता केली. ही सर्व वासरे सायखिंडी शिवारातील जीवदया मंडळाच्या पांजरपोळमध्ये दाखल केली. तसेच याच कत्तलखान्यात सुमारे 80 हजार रुपये किंमतीचे 800 किलो गोवंशाचे मांस जप्त केले. 

याबाबत शहर पोलिस ठाण्यात पो. ना. बाळासाहेब अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनामत लतीफ कुरेशी व महेबूब मोहंमद हानिफ कुरेशी (रा. मदिनानगर) यांच्यासह इतर दोघे अशा चौघांच्या विरोधात गोहत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघेही फरार झाले आहेत. अधिक तपास पो.नि.गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.आर.एम.सानप करीत आहेत. दरम्यान, शहरातील कमरल्ली   गुलाम सौदागर यांच्या बेकायदा कत्तलखान्यावर पोलिसानी छापा टाकत  30 हजारांचे 300 किलो गोवंश जनावराचे मटण असा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी कमरल्ली गुलाम सौदागर व  गुलाम इसाक सौदागर या  दोघांविरोधात गुन्हा दाखल केला ते दोघेही फरारी आहेत. पोलिस तपास करीत आहेत