दुर्बीण शस्त्रक्रिया : शोध व सद्यस्थिती

Last Updated: Feb 12 2020 8:23PM
Responsive image


डॉ. प्रवीण हेंद्रे

Change is essence of life  & we should always change for better. या उक्‍तीप्रमाणे मानवी जीवनामध्ये बदलाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. पान सडा क्यो, घोडा अडा क्यो, रोटी जली क्यो, पडा भूला क्यो याचे उत्तर फेरा ना था. म्हणूनच हा फेरा म्हणजेच बदल. स्थैर्य आले की आपली प्रगती खुंटते म्हणून वैद्यकीय शास्त्रात तर नवीन संकल्पना, संशोधन अव्याहतपणे चालू असते. दुर्बीण शस्त्रक्रिया हा या प्रवाहाचा व प्रवासाचा एक भाग बनून गेला. डिजिटल क्रांतीमुळे तर या शास्त्राला खूप मदत झालेली आढळते.

पूर्वी शिक्षण पद्धती गुरुकुल पद्धतीमध्ये मोडत होती. म्हणजे गुरूकडे शिष्य राहायला जात असे व तिथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रशिक्षण पूर्ण होत असे. वैद्यकीय शास्त्रामध्ये अवलोकन (Observation) व अनुकरण (Imitation) या दोन क्रियांमुळे कोणताही शल्य चिकित्सक प्रगल्भ होताना दिसतो म्हणूनच अमेरिकेत भारतीय डॉक्टरांना खूपच डिमांड आहे. चिकाटी व अवलोकन तसेच अनुकरण करीत असताना त्याचे विश्‍लेषण व पृथक्‍करण करण्याची सद्सद्विवेक बुद्धी ही भारतीय डॉक्टरांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे  तसेच भारतातील विविध आजारांबद्दलची माहिती असल्याने कोणत्याही Computer ची मदत न घेता क्षणार्धात निदानापर्यंत पोहोचून त्यावर निर्णयक्षमता असल्यानेच आज जगात भारतीय डॉक्टरांची गणना उच्चस्थानी होते. साधनसामग्री व प्रयोेगशाळांची वानवा असल्यानेच आपल्याकडे मूलभूत संशोधन कमी प्रमाणात आढळते. परंतु, या सोयी मिळाल्यास भारतीय शास्त्रज्ञ जगात भारी आहेत, असे म्हणावे लागेल. गुरुकुल पद्धतीने विषय समजणे सोपे होते. परंतु, पूर्वीच्या काळी गुरू एकावेळेस अनेक लोकांना शिक्षण देऊ शकत नसत.

परंतु, Digital क्रांतीमुळे आज द‍ृकश्राव्य माध्यमातून एका ठिकाणी केलेले ऑपरेशन एकाचवेळी जगभर अनेक ठिकाणी जमलेल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकते. त्याचवेळेस होत असलेल्या परिसंवादामुळे त्यातील बारकावे लक्षात घेता येणे शक्य झाले. म्हणूनच या दुर्बीण शस्त्रक्रियेचा प्रसार व प्रचार झपाट्याने झालेला आढळतो. त्याचबरोबर होणार्‍या प्रगतीमुळे कॅमेरा System अगदी CCD पासून ते Chip on tip व आज Live 3 D Camera पर्यंत मोठी झेप घेतलेली आढळते. नवीन तंत्रज्ञानाने तयार होत असलेली उपकरणे ही रुग्णाच्या सेवेमध्ये Safty Standard वाढवीत गेली. आता तर Robotic Surgery चा उगम झाला आहे; परंतु त्याचा खर्च सामान्य माणसांना परवडणारा नसल्यामुळे अद्याप सर्वश्रुत झालेला नाही.

Da Vincy नावाचे Robotic Surgery चे उपकरण तर इतके बिनधोक आहे की, त्यामध्ये ‘नजर हटी, दुर्घटना घटी’सारखे होतच नाही. कारण त्याच्या Oprate करायचा Console उपकरणामध्ये डोके बुडविल्याशिवाय रुग्णाच्या शरीरात असलेले Instrument कणभरसद्धा हलू शकत नाही.

आधुनिक काळातील धकाधकीचे जीवन व एकत्र कुटुंब पद्धतीपासून फारकत घेऊन चौकोनी कुटुंब व्यवस्थेमुळे रुग्णासाठी सेवा देण्यासाठी (उसाबर) करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ झाले. अशावेळी दवाखान्यात कमीत कमी दिवस राहण्याजोगी एखाद्या शस्त्रक्रिया तंत्राची नितांत गरज होती. ती दुर्बीण शस्त्रक्रियेमुळे पूर्ण झाली. Digital क्रांतीचा झपाट्याने 1987 ला जगापुढे आलेले हे तंत्र 1989 ला मुंबई व 1991 पर्यंत अगदी सर्वदूरपर्यंत भारतात पोहोचले. त्यानंतर सुरू झाली ती प्रात्यक्षिके व खडतर Training Programm त्यामुळेचे दुर्बीणशास्त्र आज बिनधोक झालेले आहे.

दुर्बिणीमध्ये टोकाला असलेल्या कॅमेरा आता Flexible म्हणजे 360 डीग्री अंशामध्ये कोठेही वळवून अवयवाचे अवलोकन करण्यास सक्षम झाला आहे. त्यामुळे सामान्य टाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ऑपरेशन करीत असताना खोलवर आपली नजर जाऊ शकत नाही. परंतु, त्यावर दुर्बीण शस्त्रक्रियेने मात केलेली आहे. म्हणूनच अगदी खोबणीतील पित्ताशयाची नलिका तसेच हर्नियामधील विविध अवयवांचे अवलोकन करणे केवळ दुर्बीण शस्त्रक्रियेमुळेच साध्य झालेले आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया कमी जोखमीच्या होण्यास मदत झालेली आढळते. तसेच दुर्बीण शस्त्रक्रिया ही Closed सगळीकडून बंद असलेल्या पोकळीत होत असल्यामुळे इतर अवयवाचे Handling होत नाही. त्यामुळे अशा शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर पूर्ण बरा होतो व शस्त्रक्रियेनंतर लवकरात लवकर दैनंदिन कार्य करू शकतो.

एखाद्या धान्याच्या पोत्यातील धान्याची प्रत तपासण्यासाठी आपण पोते फाडत नाही. परंतु, अशा पोत्यामध्ये बम घालून धान्याचे Sample बाहेर काढतो व पोते पूर्ववत होते. असेच काहीसे दुर्बीण शस्त्रक्रियेदरम्यान होत असते. पोटाचे स्नायू फक्‍त विलग होतात व दुर्बीण शस्त्रक्रियेची उपकरणे बाहेर काढल्यानंतर ते पूर्ववत होते. त्यामुळे दुर्बीण शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी लवकर होते व स्नायू व पोटाचे आवरण फक्‍त फाकवले जाते व ऑपरेशननंतर लगेच पूर्ववत होते. अशा अनेक सुविधांमुळे दुर्बीण शस्त्रक्रिया सर्वश्रुत झाली व वैद्यकीय शास्त्र Changed for better असेच म्हणावे लागेल. दुर्बीण शस्त्रक्रियेच्या उपयुक्‍ततेमुळेच ती आता सर्वमान्य झालेली आढळते. आता आपण विविध प्रकारच्या दुर्बीण शस्त्रक्रिया कशाप्रकारे करतात, या पुढील लेखात पाहू.