स्टिरॉईड शाप की वरदान?

Last Updated: Feb 13 2020 1:36AM
Responsive image


मयुरा अ. जाधव, वाचस्पतीविधिज्ञ

शैलजं प्रथमं, द्वितीयं रत्नजं, तृतीयं धातुजं, तुरीयं दारूजं, मृण्मयं पंचमं, षष्ठं तु क्षणिकं लिंग सप्तधापरिकीर्तितम् ॥ (लिंगमहापुराण 74- 14,16)
अर्थात; दगडापासून बनलेले पहिले शैलज. हिरा, पन्‍ना, पुखराजपासून निर्मित रत्नज. सोने, चांदी, तांब्यापासून बनलेले धातुज. लाकूड, बेलापासून निर्मित दारूज. लाल, पांढर्‍या मातीपासून निर्मित मृण्मयी. दही, तूप, हिमनिर्मित क्षणिक हेे शिवलिंगाचे सहा प्रकार आहेत. अमरनाथचे स्वरूप हिममय बर्फानी असल्याने दर्शन अल्पकाळ क्षणिक असते. म्हणून बाबा अमरेश्‍वरांचे दर्शन दुर्लभ आहे.

काश्मीर राज्यातील श्रीनगरच्या उत्तर पूर्व दिशेला 135 कि.मी. अंतरावर पवित्रस्थळ अमरनाथ धाम आहे. ते 13600 फूट उंचीवर स्थित आहे. गुफेत बर्फाचे नैसर्गिक शिवलिंग तयार होते. प्राकृतिक हिमकणांपासून निर्माण झाल्याने ते बाबा बर्फानी म्हणून प्रसिद्ध आहे. सतीचा कंठ तेथेे पडलेला आहे. त्यामुळे 51 शक्‍ती पीठांपैकी महामाया शक्‍तिपीठ गुफास्थित आहे. श्रीनगरहून बलटालला गाडीने जावे लागते. बलटालहून निघालेले हेलिकॉप्टर पंजतरनीला उतरते. तेथून गुफा दोन कि.मी. दूर आहे. हे दोन कि.मी. अंतर फक्‍त तीस टक्के श्रद्धाळू चलो बुलावा आया है बाबा ने बुलाया है। म्हणत पायीचालत पार करतात. मुखाने ॐ नमशिवाय:चा जाप करत क्षणभंगूर आत्म्याने शाश्‍वत परमात्म्याच्या दर्शनाला चालत जावे.

काम, लोभ, क्रोध, मद, मोह, मत्सर यांचा त्याग करावा. भक्‍ताचेमस्तक झुकलेलेे व हात प्रार्थनेसाठी उठलेले असावेत तरच जीव आणि शिव एकरूप होतो, असे शास्त्रवचन आहे. ऑक्सिजनच्या कमीमुळे श्‍वासोच्छ्वास जलद केला जातो. नाकातून पाणी वाहू लागते. शिंकरून नाकाची त्वचा सोलली जाते. अतिथंड वातावरण शरीराला सहन होत नाही. डॉक्टर म्हणाले,‘यू आर इन क्रिटिकल कंडिशन. फॉगी अँड रेनी अ‍ॅटमॉसफिअर.  गेट बॅक! टू अवर्स. टेक दर्शन. गेट बॅक अ‍ॅन्ड हॉस्पिटलाईज्ड्. ‘त्यावेळी इएनटी सर्जनने नाकपुडीत अत्यंत महागडे स्टेरॉईड औषधासह स्प्रे केलेे. स्नायूंना पेटके, कॅ्रम्प् येऊ नयेत, सांधे आखडू नयेत, म्हणून माकड हाडावरील त्वचेवर मेडिसिन स्टेरॉईड पॅच लावले. चार कि.मी. पहाडी अंतर पस्तीस मिनिटांत धावत पार केले, ते केवळ योग्य उपचार आणि गाईडमुळे. यू आर इन सेफ हॅन्डस् अशी काळजी घेणारे डॉक्टर त्यावेळी तुमच्यासाठी परमेश्‍वराचे दूत असतात.

एण्ड्रोजन, अनाबॉलिक स्टिरॉईड :

एण्ड्रोजन हा ग्रीक शब्द एंड्रोस पासून निर्माण झाला, याचा अर्थ आहे एक व्यक्‍तीचे जीन. तर अनाबॉलिक शब्दाची उत्पत्ती ग्रीक अनाबोलेपासून झाली, याचा अर्थ ऊपर ऊठा हुआ टीला. एक असे औषध व्यक्‍तीचे हार्मोन्स, टेस्टोस्टेरोन आणि डिहाइड्रोटेस्टोस्टेरोन इ.ना प्रभावित करते. कोशिकांच्या आत प्रोटिन संश्‍लेषणामध्ये वृद्धी करते. ज्याच्या परिणामस्वरूप सेल्युुलर ऊतकांचा विकास मांसपेशीत होतो. अनाबॉलिक रॉईडमध्ये नर हार्मोन्स आणि पौरुष गुण असतात. ज्यामुळे व्यक्‍तीचे स्नायू नजरेत भरण्याइतपत मोठे आणि पुष्ट होतात.शिरा टरटरून मांसपेशीतून आता बाहेर पडतीलच असे वाटते. टेस्टोस्टेरोनमुळे मांसपेशींचा निर्माण विकास होतो, असा शोध 1940 मध्ये लागला. त्याचा वापर करून रूसी संघाने ऑलिम्पिक प्रदर्शनात पदके मिळविली. रूसी वेटलिफ्टरांच्या सफलतेच्या प्रतिक्रिया स्वरूप अमेरिकी ऑलिम्पिक  टीमचे चिकित्सक डॉ. जेग्लेर यांनी अनाबॉलिक स्टिरॉईडचा विकास करून सिंथेटिक दवा बनविली. सिबा फार्मास्युटिकल्सने त्यात भर घालून मिथेन ड्रोस्टेनोलेन चे निर्माण केले. ज्याचे विपणन डायनाबोलच्या गोळ्या आणि इंजेक्शनच्या रूपात जगभर होते. डॉ.जेग्लेरने अन्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डायनाबोलची छोटी खुराक घ्यावी, अशी एथलिटना सक्‍त सूचना दिली होती.

परंतु, लोक अतिप्रमाणात सेवन करून प्रोस्टेटस् आणि एड्रोफिएड टेस्टेसने पीडित झाले. 1976 मध्ये आईओसीने प्रतिबंधित पदार्थाच्या सूचित त्याचे नाव घातले. एक दशकानंतर समितीने विजेत्या खेळाडूंना प्रतियोगितेतून बाहेर करण्यासाठी डोपिंग परीक्षण सुरू केले. कारण याचा उपयोग एथलिट प्रतियोगितेच्या दरम्यान न करता प्रशिक्षण अवधीच्या दरम्यान करत होते आणि पदक मिळवित होते. नामांकित जीममध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आधी तीन महिने तुम्ही बाथरूममध्ये  जा. तेथील डस्टबीन पायाने उघडले असता त्यात सुया वाकवलेली इंजेक्शन आणि गोळ्या खाऊन चुरगाळून फेकलेली कव्हर दिसतात. एक्‍लिलेशन मिथेल हे सक्रिय कार्बन यौगिकांचा समूह असतो, ज्याच्या चार रिंगांमध्ये सतरा कार्बन परमाणू व्यवस्थित असतात. सतरा बिटा स्थानात टेस्टोस्टेरोनचे एस्टेरिफिकेशन आणि नोरटेस्टोसेटेरोन पदार्थ पेरेंटेरली प्रशासित करण्याची अनुमती देतात.

अतिस्टिरॉईड सेवनाचे शाप स्वरूपातील दुष्परिणामः 

पिक्चरमधील हीरो, हिरॉईनची बॉडी बघून सर्वजण प्रभावित होतात. त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन न्यूट्रिशन प्लॅन वापरून अशी शरीरयष्टी कमावलेली असते. सध्याच्या तरुण पिढीला वर्षानुवर्षे वाट पाहण्याची सहनशक्‍ती नसते. झट् जीम पट् बॉडी असा त्यांचा फंडा असतो.लार्जर दॅन इमेज कथा ऐकून तरुणवर्ग प्रभावित होतो आणि स्टेरॉईडचा शॉर्टकट वापरतो. हे सेव्हन्टीन अल्फा अल्कायलेटेड श्रेणीत असून बाजारात स्वस्त उपलब्ध होते आणि शरीरात चार तासांपर्यंत राहून स्टॅमिना वाढविते. त्यामुळे प्रिवर्कआऊट याचे सेवन होते. गोळ्या खाल्ल्या तर लिव्हर प्रोसेस करते, किक येण्यास वेळ लागतो. मोठी सिरीज वापरल्यास मेन ऑर्गन्स डॅमेज होण्याचा धोका असतो म्हणून त्वरित परिणामांसाठी सहा एमएम लांब सिरीज असलेले इंजेक्शन वापरतात. इंजेक्शन  पार्श्‍वभागावर आणि दंडावर टोचले जाते. उत्तेजक सरळ मसल्स व रक्‍तात मिसळल्याने त्वरित किक येते. त्याच अपेक्षित मौसममध्ये लार्ज वेट विथ् मेनी रेपिटेशन्स केली जातात. यामुळे शरीर पिळदार बनते. ओव्हरडोसमुळे कालांतराने कावीळ होते. यकृताला व किडनीला नुकसान पोहोचवते. शरीरात वॉटर रिटेन्शन करते, त्यामुळे शरीराचे  आकारमान वाढते व फुगते. आकारमान रक्‍तदाब वाढविते. स्त्रियांची नजाकत नष्ट होऊन काखेत आणि जांघेत संत्री  धरल्यासारखी छाती फुगवून चालले जाते. स्त्रियांच्या भगांकुरात वृद्धी होते. स्वर रज्जूंचे वर्धन झाल्याने आवाज पुरुषी आणि घोगरा बनतो. पाठीवर मोड्या उठतात. चेहर्‍यावर पिंपल्स येतात. ओठावर दाट केस येतात. मासिक धर्म चुकतो. वर्ल्ड अँटिडोपिंग एजन्सी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीसाठी कार्य करते. 

ज्या खेळाडूंनी पदक मिळविलेले आहे त्यांचीच प्रामुख्याने उत्तेजक द्रव्य तपासणी केली जाते. किरकोळ स्पर्धेत साधनसामग्रीची व निधीची कमतरता असल्याने तपासणीकडे दुर्लक्ष केले जाते. कोणीतरी एक वाममार्गाने, शॉर्टकटने जाते आणि संपूर्ण फिटनेस इंडस्ट्री बदनाम होते. मानवी शरीराची रचना सिक्स पॅक मस्क्युलर असण्यापेक्षा फिट विथ् एनर्जी, तंदुरुस्त असण्यावर भर देते.तंदुरुस्ती नैसर्गिक आहाराने व माफक व्यायामाने मिळते. सत्यावर आणि उच्च संस्कारावर विश्‍वास ठेऊन स्वत: व्यायाम 
करा आणि मुलांना, कुटुंबाला  व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित करा.