दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करा!

Last Updated: Oct 10 2019 2:51PM
Responsive image

Responsive image

जगदीश काळे


सकाळचा नाष्टा करण्याआधी तुम्ही काय करता आणि काय खाता हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्यातही जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हे खूपच गरजेचे आहे. लिंबू हा आपल्या रोजच्या खाण्यातला तोंडी लावण्याचा घटक; पण हा लिंबू जर आपल्या रोज सकाळच्या सेवनात आला तर काय कमाल होऊ शकते ते पाहू :

- लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रोजच्या खाण्यात लिंबाचा वापर केल्यामुळे प्रतिकारशक्‍ती सुधारते. लिंबू हा दाहकताविरोधी असल्यामुळे तो शरीरातील लोह शोषणाचे प्रमाण वाढवतो. शिवाय, यातील सॅपोनिन नावाचा घटक शरीरातील सूक्ष्म जंतूंचा नाश करतो. यात पोटॅशियम हा घटक असल्याने रक्‍तदाबावर नियंत्रण ठेवता येते. 

- लिंबामुळे जठर व आतड्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन पचनशक्‍ती सुधारते. त्यामुळेच काहीही खाल्लेले नसताना, अर्थात रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिणे फायदेशीर ठरते.

- शरीरातील आम्लाचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम लिंबाचा रस करीत असतो. लिंबू हा आम्लधर्मी पदार्थ आहे. त्यामुळे त्याचा योग्य वापर शरीरातील आम्लाला नियंत्रित करून शरीरातील पीएचची पातळी वाढवतो. पीएचची पातळी नियंत्रित राहणे खूप आवश्यक आहे. कारण, शरीरातील आम्लधर्मीय गुणांमधील बदलामुळेच शरीराला ताप, डोकेदुखी इ. अनेक आजार होतात. 

- लिंबाचा रस नैसर्गिक डाययुरेटिक म्हणून काम करतो व त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. लिंबाचा रस त्याच्या आतील पल्पासहित प्यायल्यास, तो रस आतड्यातील सर्व विषद्रव्ये साफ करतो. 

- लिंबाचा रस त्वचेतील विषद्रव्ये काढून टाकतो. त्यामुळे त्वचा नितळ व कांतिमान होते. शरीरातील आम्ल प्रमाणित राहिल्यामुळेही त्वचा मुलायम बनते.     यातील सायट्रिक अ‍ॅसिड मुखदुर्गंधी दूर करून श्‍वासात तजेला आणते. प्रत्येक जेवणानंतर लिंबाचा रस प्यायल्यास ब्रश करायची वा माऊथ वॉश वापरायचीही गरज नाही. पण, सायट्रिक अ‍ॅसिडच्या सेवनानंतर लगेच ब्रश केल्यामुळे मुळे दातांची झीज होऊ शकते. त्यामुळे लिंबूपाणी प्यायल्यावर लगेच ब्रश करू नये. 

- शरीराला पेक्टिन फायबरचा पुरवठा जास्त झाल्यामुळे सारखी भूक लागत नाही व वजन कमी होण्यास मदत होते. 

- लिंबू शरीराला अल्कली स्टेटमध्ये ठेवून शरीराचे आरोग्य चांगले ठेवतो. त्याचबरोबर लिंबाचा रस कॅन्सर आणि हृदयरोगाचा धोका खूप प्रमाणात कमी करतो. 

- सकाळी उठल्यावर लगेच लिंबाचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले असते. लिंबू मधोमध कापून त्याचे दोन भाग करावेत. एका पेल्यात पाणी घेऊन दोन्ही भाग त्या पेल्यात पिळावेत. यासाठी ताज्या लिंबांचा वापर करावा. बाजारात मिळणार्‍या रेडिमेड लिंबू पाण्याचा वापर करू नये. ताज्या लिंबाच्या रसात रेडिमेड रसाच्या तुलनेत, 5 पट जास्त फायबर असतात. लिंबाचा रस प्यायल्यावर किमान 15 मिनिटे काही खाऊ नये.

धुळ्याच्या सुषमा राजपूत यांचे ग्रीसच्या पंतप्रधानांकडून कौतुक 


हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक


रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती