Mon, Mar 25, 2019 21:24होमपेज › Aarogya › सावधान; ‘या’ गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नका!

सावधान; ‘या’ गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नका!

Published On: Mar 13 2018 1:03PM | Last Updated: Mar 13 2018 1:05PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पल्लवी साधारण १९ वर्षाची कॉलेज तरूणी. नेहमीप्रमाणे दुपारी घरी आली आणि जेवण करून झोपी गेली. पण थोड्यावेळाने तिच्या अचानक पोटात दुखू लागलं..तिने अनेक घरगुती उपाय केले तरी तो त्रास कमी होईना. शेवटी ती दवाखान्यात गेली. क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी तिला विचारले की आज काय खाल्ल होते. त्यावर ती बोलली, रोजचेच जेवण खाल्ले होते. मी रोज कॉलेज कॅन्टीममध्ये नाश्ता करते पण आज ते ही केले नाही. घरीच जेवले होते. डॉक्टरांनी तीला विचारले, जेवणात काय-काय खाल्ले. ती बोलली, आज आर्इ नव्हती. त्यामुळे घरीच शिळा भात फोडणी देवून खाल्ला...आता डॉक्टरांच्या लक्षात आले की नक्की काय झालय. डॉक्टरांनी तिला सांगितले की, तुझ्या पोटदुखीचे खरे कारण हे घरचेच खाणे आहे. 

घरातील खाणे चांगले असते पण, काही पदार्थ पुन्हा गरम करून खाल्याने अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते, असेही  डॉक्टर म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी असे कोणते पदार्थ आहेत जे गरम केल्यामुळे आरोग्यासाठी घातक असतात याची माहिती दिली. चला तर मग पाहूयात असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्याने तुमची तब्येत बिघडू शकते... 

चिकन
चिकन पुन्हा गरम केल्यास त्यातील प्रोटीन्स कॉम्पोजिशनमध्ये परावर्तीत होतात. त्यामुळे त्याचे पचन व्हायला अनेक समस्या निर्माण होतात.

Image result for चिकन

बटाटे
बटाटा आरोग्यासाठी चांगला असतो असे म्हणतात. पण, बटाट्याची भाजी बनवून अधिक वेळ ठेवली तर त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. बटाटा पुन्हा गरम करून खाल्यास त्याचे पचन लवकरत होत नाही.

Image result for Batata

बीट
तुम्ही बीटाची भाजी बनवून खात असाल तर ते पुन्हा गरम करू नये.  असे केल्याने त्यातील नायट्रेट संपते. 

Image result for बीट

मशरूम
मशरूमला पोषक तत्वांचा खजिना म्हटले जाते. त्यामुळे ते खरेदी करताना नेहमी फ्रेश असतील याची खबरदारी घ्यावी. मशरून पुन्हा गरम केल्याने यातील प्रोटीन्स कॉम्पोजिशनमध्ये परावर्तीत होतात आणि शरीरासाठी ते हानीकारक असते. 

Image result for मशरूम

अंडे
प्रोटीन्सचा साठा म्हणून अंड्याची ओळख आहे. पण, ते पुन्हा गरम केल्याने अंड्यातील प्रोटीन्स तुमच्यासाठी विष ठरू शकतात.

Related image

पालक
पालक पुन्हा गरम करून खाणे कॅन्सरचे कारण बनू शकते. पालक भाजीतील नायट्रेट पुन्हा गरम केल्याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. 

Related image

 

तेल
साधारणपणे प्रत्येक घरात पापड तळल्यानंतर शिल्लक राहणारे तेल दुसऱ्या भाजीसाठी वापरले जाते. ते पुन्हा पुन्हा वापरल्याने त्यात एल्डीहाइड्स नावाचे केमिकल तयार होते. हे केमिकल अतिशय विषारी असते. हे केमिकल मानवी रक्तवाहिण्यांशी संबंधित रोग आणि कॅन्सर होण्यासाठी जबाबदार असतात. 

Related image

भात
कच्च्या तांदुळात काही किटक असतात. जे तांदुळ शिजवल्यानंतर नष्ट होतात. पण, भात थंड झाल्यानंतर ते पुन्हा त्यामध्ये येतात. त्यामुळे भात पुन्हा गरम केल्याने ते किटक मरत नाहीत. पुन्हा गरम केलेला भात खाल्याने फुड पॉयजनिंग होते. 

Image result for rice

हे सर्व ऐकल्यानंतर पल्लवीने डॉक्टरांना पुन्हा एक प्रश्न केला की, असे का होते? म्हणजे अन्न गरम केल्यानंतर त्यातील किटक मरायला हवेत पण तसे का होत नाही? 

यावर डॉक्टर म्हणाले, जेवण पुन्हा गरम केल्याने त्यातील जीवनसत्व संपतात. काही पदार्थ असे आहेत जे पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीन्स कॅन्सरच्या विषाणूंमध्ये परावर्तीत होतात. थोडक्यात सांगायचे तर अन्न पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रोटीन्स संपतात. त्यानंतर ते अन्न खाण्यायोग्य राहत नाही.