Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Aarogya › व्यायाम फक्‍त 90 मिनिटेच!

व्यायाम फक्‍त 90 मिनिटेच!

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 11 2018 8:39PMश्रीकांत देवळे

आकर्षक शरीरठेवण, तंदुरुस्ती आणि आरोग्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. ती कोणी नाकारू शकत नाही. पण, काही लोक तंदुरुस्ती आणि दिसण्याबाबत इतके चिंताग्रस्त असतात की ते गरजेपेक्षा अधिक व्यायाम करतात. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम शरीरावर प्रभाव पडतो आणि मेंदूवरही प्रभाव पडतो. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून एक निष्कर्ष स्पष्ट झाला आहे, ते म्हणजे सतत 90 मिनिटांहून अति व्यायाम केल्यास तो धोकादायक असतो. 

सर्वसाधारणपणे आठवड्यातून किती दिवस आणि किती वेळ व्यायाम करावा हे प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून असते. सर्वसाधारण वजन असलेल्या लोकांना आठवड्यातून 4-5 दिवस व्यायाम करावा. त्यामुळे व्यायामादरम्यान स्नायूंवर जो दाब पडतो तो 2-3 दिवसांत कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो. स्थूलपणा किंवा जाडेपणा असल्यास शारीरिक क्षमतेनुसारच व्यायाम करावा. 
ज्या दिवशी व्यायाम करणार नसाल तेव्हा धावणे, पळणे, चालणे असेही व्यायाम करू शकते. त्याशिवाय योगासने आणि प्राणायामदेखील करता येतील. 

सलग 90 मिनिटे व्यायाम नको

शरीरामध्ये ताकद असेल तर जास्त वेळ व्यायाम करू शकता. पण, शरीरविज्ञानानुसार सलग 90 मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करू नये. खूप जास्त व्यायाम करायचा असेल तर 90 मिनिटांचा व्यायाम झाल्यानंतर थोडा वेळ जाऊ द्या किंवा ब्रेक घ्या मग पुन्हा व्यायामाला सुरुवात करा. व्यायामादरम्यान मध्ये मध्ये पाणी जरुर प्यावे. 

मानसिक आरोग्यावर प्रभाव -

जिममध्ये जाऊन घाम गाळण्याचा परिणाम शरीरावर दिसो ना दिसो त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. संशोधनानुसार, जास्त वेळ व्यायाम केल्याने मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे विचार करणे, आकलन आणि मते बनवण्याची क्षमता कमी होते. अहवालानुसार विशेषतः महिलांसाठी ही गोष्ट घातक आहे. ज्या महिला बारीक दिसण्यासाठी खूप वेळ जिममध्ये घालवतात त्यांचे मानसिक संतुलन कोणत्याही वयात ढळू शकते आणि त्यांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्‍ती क्षीण होते. 

अरिथमियाची शिकार -

चांगल्या प्रशिक्षकाच्या मदतीने धावणे किंवा पळणे याचे प्रशिक्षण न घेणार्‍या व्यक्‍तींना अरिथमियासह अनेक हृदयरोगांची जोखीम वाढू शकते. संशोधकांच्या मते अ‍ॅथलिट किंवा धावपटूंनी दररोज एक तास जोरकस व्यायाम केला पाहिजे. पण, जर ते हलका व्यायाम करणार असतील तर त्याची वेळ वाढवली पाहिजे. त्याशिवाय नियमितपणे हृदयाची तपासणी करत राहिले पाहिजे. खूप जास्त व्यायाम आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला नाही. रोज 30 मिनिटे ते 60 मिनिटे व्यायाम केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.