अशी घ्या दातांची काळजी

Published On: Aug 14 2019 11:26PM | Last Updated: Aug 14 2019 11:26PM
Responsive image


डॉ. निखिल देशमुख

आपल्या एकंदर आरोग्याचा, सुद‍ृढतेचा आपल्या दातांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. दात चांगले असतील तर पचनसंस्थाही सुद‍ृढ राहते. म्हणून केवळ दात चांगले दिसावेत म्हणून नाही तर दात मुळातूनच चांगले असावेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक ठरते. घरच्या घरी दातांची दैनंदिन निगा राखली तर दातांच्या सौंदर्याला सुद‍ृढतेचीही जोड मिळू शकते. त्यासाठी फार खर्च न करता, अगदी लहानपणापासूनच दातांची काळजी कशी घेता येऊ शकते, हे सुचवण्याचा प्रयत्न.

माणूस सोडून इतर कोणताही दात असलेला प्राणी साखर खात नाही. त्यामुळे त्यांचे दात किडतही नाहीत. त्यामुळे गोड खाण्यावर नियंत्रण मिळवणे आणि गोड खाल्ल्यावर जाणीवपूर्वक दात स्वच्छ करणे गरजेचे ठरते. दातांची कीड रोखण्यासाठी फ्लुरॉइडयुक्‍त टूथपेस्टचा वापर करणेही हिताचे मानले जाते.

दररोज आणि व्यवस्थितपणे घरच्या घरी दातांची निगा राखल्यास ते दीर्घकाळ निरोगी राहतात. अर्थात यात सर्वात महत्त्वाचे असते ते दात स्वच्छ करणे. या स्वच्छतेसाठी योग्य पद्धतीने ब्रश करणे गरजेचे आहे. आपला टूथब्रश घट्ट आणि कडक असेल तर त्यामुळे हिरड्या सोलवटून निघतात आणि त्यांचे नुकसान होते. म्हणून दातांच्या स्वच्छतेसाठी मऊ केस असलेला टूथब्रश वापरणे हितकारक! 

दातांच्या सौंदर्याबाबतही अजून म्हणावी तितकी जागरूकता झालेली नाही. खरेतर वेळेवर केलेल्या योग्य ट्रिटमेंटमुळे चेहर्‍याचे सौंदर्य तर वाढतंच; पण दातांचं आरोग्यही सुधारतं. म्हणूनच दातांसंदर्भातले गैरसमज दूर करून नव्या जमान्यानुसार शास्त्रशुद्ध विचाराने दातांच्या आरोग्याकडे पाहायला शिकण्यातच हित सामावलेले आहे.

आपल्या लेकराचे दात किडू द्यायचे नसतील तर काही सवयींपासून पालकांनी बाळाला जाणीवपूर्वक दूरच ठेवायला हवे. उदाहरणार्थ-बाळाला दूध पाजत निजू देणं, तोंडात बाटली ठेवून बाळाला निजवणं इत्यादी. तसेच अंगठा किंवा बोटं चोखल्याने किंवा चोखणी चोखल्याने, समोरचे दात पुढं येण्याची शक्यता वाढते. हेही टाळता येण्यासारखं असतं.
 साधारणत: वयाच्या सहाव्या वर्षी सर्वांत मागे एक दाढ येते. ती कायमच्या दातांपैकी असते. म्हणून तिच्या आरोग्याकडं फार लक्ष द्यायला हवं.
 सर्वसाधारणपणे दाताचा रंग आणि ठेवण याविषयी जास्त चर्चा होताना दिसते. त्याहीपेक्षा अधिक महत्त्व दातांच्या आरोग्याला, स्वच्छतेला आणि सुदृढतेला द्यायला हवे.

दात व हिरड्यांसाठी त्रासदायक न ठरणार्‍या ब्रशने दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करा. ब्रश करताना त्याचे केस हे हिरड्या आणि दात यांच्यामधल्या जागेत ठेवून हलक्या हाताने फिरवा. त्यामुळे याठिकाणी अडकून बसलेले विषाणू निघून जातात. त्यानंतर गालाच्या आतील, जीभ आणि दातांच्या चावण्याचा भाग इथं हलकेपणाने ब्रश फिरवून दात साफ करा.   

आपल्या लेकराच्या कायमच्या दाताला इजा झाली तर आता काहीच उपाय नाही, अशा गैरसमजातून अनेक पालक घाबरून जातात, हातपाय गाळून बसतात. पण खरेतर उपाय सापडू शकतो. कायमच्या दाताला इजा झाल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावं. तसंच कायमच्या दातांपैकी एखादा दात पडला तर शक्य असल्यास लगेचच स्वच्छ डबीत दुधात किंवा लाळेत घालून तासाभरात डॉक्टरांकडे न्यावा. तो लगेच परत बसवता येण्याची अनेकदा शक्यता असते. ती तपासून पाहता येते.
 दात घसाघसा घासू नका; तसे केल्यास हिरड्या आणि दातांचे नुकसान होण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे ते टाळा. 
 प्रत्येक जेवणानंतर हलकेच फ्लॉसिंग करणे हा दात स्वच्छ ठेवण्याचा उत्कृष्ट उपाय आहे.

आपल्यातले अनेकजण महिनोनमहिने एकच ब्रश वापरतात. ही सवय अहितकारक आहे. विषाणू हे ब्रशच्या केसांवर वाढतात. म्हणून आपला टूथब्रश दर तीन महिन्यांनी आणि आजारपणानंतर अवश्य बदला. 

ब्रश केल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर हिरड्यांतून रक्‍त आल्यास, हिरड्या लाल, सुजलेल्या किंवा नाजूक झाल्यासारखे वाटल्यास, हिरड्या दातांपासून बाजूला ओढलेल्या असल्यास, हिरड्यांना स्पर्श केल्यास आपले दात आणि हिरड्या यांच्यामधल्या जागेतून पू आल्यास, कवळी फिट बसण्याच्या पद्धतीत काही बदल झाल्यास, आपण चावत असताना आपले दात एकमेकांवर ज्या पद्धतीने बसतात त्यात काही बदल झाल्यास, आपल्या तोंडात घाण वास किंवा वाईट चव सतत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यात टाळाटाळ करू नका. यातच तुमच्या दातांचे आणि तुमच्या सर्वांगीण सुद‍ृढतेचे हित सामावलेले आहे.बीड : लग्‍नास नकार दिल्याने महिलेच्‍या डोक्‍यात घातला दगड


भीम आर्मीचे आरएससच्या बालेकिल्ल्यातून सरसंघचालकांना आव्हान!


थेट नाणार गावात सभा घेऊन शिवसेना भूमिका जाहीर करणार


मालेगाव : तु हमारे झगडे में गीर मत म्‍हणत भोसकून शेजाऱ्याचा खून


पुणे : माझी सांस्कृतिक ओळख-माझा शाश्वत विकास परिषदेचे आयोजन (video)


पुणे : सरकार विरोधात भाजपचे धरणे आंदोलऩ (video)


'महाविकास अघाडीतील तिन्ही पक्षांना सुसंवादाची गरज'


मिग २९ लढाऊ विमान गोव्याजवळ क्रॅश


चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी १० ते १२ वर्षे लागतील : पवार 


ट्रम्प यांच्या कार्यक्रमापूर्वीच जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे गेट कोसळले