Tue, Jul 23, 2019 17:02होमपेज › Aarogya › केस धुतल्यानंतर...

केस धुतल्यानंतर...

Published On: Sep 06 2018 1:44AM | Last Updated: Sep 05 2018 8:38PMवनिता कापसे

वाढते प्रदूषण आणि धूळ यांचा परिणाम केसांवर होत आहे. सर्वसामान्यपणे केस शॅम्पूने धुणे, तसेच बाजारातील नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून केसांची काळजी घेणे हे उपाय सर्वच जण करत असतात.  केस धुण्यापूर्वी आपण तेल मालीश, स्पा, हेअर मास्क या आणि इतर गोष्टी करत असतो. मात्र केस धुतल्यानंतरही त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. ही काळजी घेतल्यास केस छान मुलायम होतील. 

केस वाळवणे : केस धुतले की टॉवेलने चांगल्या प्रकारे वाळवावेत. त्यासाठी केसाला टॉवेल गुंडाळावा, त्यामुळे केसाचे पाणी कपड्यांवर, जमिनीवर ओघळणार नाही. केसाच्या उंची आणि दाटपणा यावरून त्यासाठी किती वेळ लागेल ते ठरते. 

तेल मालीश : केस धुण्यापूर्वी तेल मालीश केली जाते मात्र केस धुतल्यानंतरही आपण केसाला तेल लावू शकतो. म्हणजे अगदी तेलाने केस चप्प करण्याची गरज नाही. पण केस धुतल्यानंतर ऑलिव्ह तेलाचे काही थेंब केसात मालीश करून लावता येतात. त्यामुळे केसाला पुरेेसे पोषण मिळते. सर्वात शेवटी केसाला ऑलिव्ह तेल लावावे. खूप तेल लावण्याची गरज नाही. केस सुकले की पहिले हेच काम करावे. 

केस विंचरणे : केस धुताना गुंततात. त्यामुळे ते हळूवारपणे सोडवले पाहिजेत. पण ओल्या केसातून कंगवा फिरवल्यास ते अधिक तुटतात. मात्र केस चांगले सुकले आणि थोडे तेल लावले तर केस न तुटता व्यवस्थित विंचरले जातात. शिवाय केस धुतल्यावर जरा जाड दातांचा कंगवा वापरून खालून वर अशा पद्धतीने केस सोडवावेत. त्यामुळे केस न तुटता सहजपणे विंचरले जातील. 

डी फ्रीजिंग : केस डी फ्रीजिंग करण्यासाठी एका विशिष्ट गोष्टीची गरज असते. कोरफडीचा वापर त्यासाठी करता येऊ शकतो. केसासाठी कोरफडीचे अनेक फायदे आहेत. केस सुकले की ते विस्कटल्यासारखे  दिसतात. केस वाळल्यावर कोरफडीचे जेल घेऊन ते डोक्याच्या त्वचेवर मालीश केल्यास केस व्यवस्थित राहतील.