Wed, Oct 17, 2018 22:37
    आकाशी रंग संवेदनशील आणि भावुकतेचे सुचक आहे. या रंगाचा फिकट शेड मनात ताजेपणा उत्पन्न करतो. आकाशाची अथांगता या रंगातून प्रतित होते. जीवन देणाऱ्या पाण्याचा रंगही निळा असतो. डोळ्यांना शीतलता देणारा, सुखावणारा हा रंग नवरात्रीचा सातवा दिवस आणखी शुशोभित करतो. निळा सावळा राम, कृष्‍ण ही सारी विष्‍णूची रुपं निळ्या रंगाला सगुण साकार करतात. निळ्याची नवलाई मनाला शीतलता प्रदान करते. निळा रंग शांतता आणि समृध्दी देऊन जातो. हा रंग आकर्ष असतो. निळ्या रंगाची वस्‍त्रे शुभ मानली जातात.

    देवीचे आठवे रूप : महागौरी देवी दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची उपासना केली जाते. ही देवी धन-वैभव आणि सुख-शांतिची अधिष्ठात्री देवी मानली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्या पराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे.


  • आणखी पहा

    साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तश्रृंगी
    अठराभुज, भव्य दिव्य रूप, साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धे शक्तीपीठ म्हणून वणीच्या सप्तशृंगीमातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ किलोमीटर दूर आहे. नांदूरी गाव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी आहे. वर जायला ११ किलोमीटरचा रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो.


  • आणखी पहा