Responsive image

शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग कधी?

By santosh.kanmuse | Publish Date: Jan 18 2020 8:12PM

अनिल आगवणे

शासकीय कर्मचारी तसेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. परंतु, जानेवारी 2019 पासून अजूनही महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यात येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांच्या पेन्शनमध्ये अडथळे येत आहेत. आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ पात्र कर्मचार्‍यांना मिळत नाही. जुन्या सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणारा पगारसुद्धा वेळेत मिळत नाही. पगारासाठी फक्‍त प्राचार्यांची सही आवश्यक असताना संस्थाचालकांची सही घेतल्याशिवाय पगार होत नाही. त्यामुळे पगारास विलंब होत आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करून फरकासहित व आश्‍वासित प्रगती योजनेच्या लाभासहित शासकीय जीआर काढून या कर्मचारीवर्गाला न्याय दिला 
पाहिजे.