Responsive image

अपयश झाकण्याचा प्रयत्न?

By triratna.kamble | Publish Date: Jun 23 2019 7:52PM

नरेश घरत

दाभोलकर-पानसरे यांची हत्या होऊन 4 वर्षांहून अधिक कालावधी उलटला, तरी तपास यंत्रणा या हत्येचा उलगडा करण्यास असमर्थ ठरल्यामुळे न्यायालयाने तपास यंत्रणांना वेळोवेळी धारेवर धरले आहे. या प्रकरणांविषयीच्या आतापर्यंतच्या बातम्यांचा अभ्यास केल्यास या प्रकरणात नक्‍की आरोपी तरी किती, याविषयी संभ्रम निर्माण होतो. आता तर सीबीआयने कथित आरोपींच्या वकिलांनाच आरोपी बनवून पिंजर्‍यात उभे केले आहे. त्यामुळे एकूणच तपास यंत्रणेविषयी संशय वाटतो. आरोपीच्या वकिलांना अटक करून मुळावर घाव घालण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्नही निष्फळ ठरल्याचे सिद्ध झाले आहे. पुनाळेकरांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या जमावात सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाचे वकीलही सहभागी झाल्याचे दिसून आले.  केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घालून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा.