Responsive image

निर्णयाची अंमलबजावणी व्हावी!

By santosh.kanmuse | Publish Date: Nov 10 2019 8:06PM

विश्‍वनाथ पंडित

सीबीएसई, आयसीएसईसह सर्वच शिक्षण मंडळांच्या शाळांना मराठी भाषा विषय सक्‍तीचा आणि बंधनकारक करण्याची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. खर म्हणजे, राज्यात मराठी भाषेचे शिक्षण सक्‍तीचे केले जावे, असा शासन निर्णय 2009 मध्येच जाहीर झाला होता. परंतु, त्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नव्हती किंवा झाली नाही. निदान यापुढे तरी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी होत राहील, अशी आशा करावयास हरकत नाही. सरकार जनतेसाठी लहान-मोठे खूपसे चांगले नियम आणि कायदे करीत असते; मात्र ते कर्तव्यकठोरतेने, सातत्याने राबविले जातातच, असे नाही. जनहिताचे निर्णय, कायदे, नियम राबविले जावेत. त्यात खंड पडता कामा नये.