Responsive image

अधिक किमतीने विक्री करून लूट !

By dhanaji.surve | Publish Date: Jul 01 2019 8:26PM

राजू जाधव

सध्या बाजारात किंवा किराणा मालाच्या दुकानात अनेक वस्तू या एमआरपीपेक्षा चढ्या दराने विकल्या जातात. खरं तर एमआरपीद्वारे त्या उत्पादनाची किंमत ठरवलेली असते. त्यावर इन्क्‍लुजिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस अर्थात सर्व करांसहित असा उल्लेखही असतो. तरीही काही व्यापारी ठरलेल्या दरापेक्षा जास्त दराने मालविक्री करतात. त्यामुळे ग्राहक  आणि दुकान मालकात तंट्याचे प्रसंगही घडत आहेत. मुळात व्यापारी नियम मोडत आहेत. त्यामुळे अशा व्यापार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. विशेषतः, शीतपेयांबाबत व्यापार्‍यांकडून हे सर्रास अवलंबले जाते. त्यामुळे प्रशासनाने यावर लक्ष ठेवून अशा व्यापार्‍यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.