Responsive image

राजकारण्यांची सोईची विधाने 

By santosh.kanmuse | Publish Date: Jan 18 2020 8:12PM

 दीपक गुंडये

महापालिकेच्या अधिकार्‍याला बॅटने मारहाण करणार्‍या आमदार आकाश विजयवर्गीय जामिनावर सुटल्यानंतर, तुरुंगातील अनुभव चांगला होता. मी देवाची प्रार्थना करतो, की त्याने पुन्हा मला फलंदाजी करण्याची संधी देऊ नये. आता मी गांधीजींनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालेन, असे वक्‍तव्य केले. पकडले गेल्यानंतर रागात असल्याने काय करत आहोत याची जाणीव नव्हती, असे ते म्हणाले होते. तर मारहाणीच्या वेळी माध्यमांशी बोलताना, आधी आवेदन आणि नंतर दणादण, हीच नीती असल्याचे सांगितले. म्हणजे हिंसेमुळे तुरुंगात जावे लागले, तर सुटका झाल्यावर अहिंसा आठवली. प्रसंगानुसार सोईची वक्‍तव्ये करण्याचा राजकीय गुणधर्म त्यांनी अंगी बाणवला आहे, हेच परस्परविरोधी विधानांतून दिसते.