Responsive image

संतवाणी : जगाच्या कल्याणा..

By anirudha.sankpal | Publish Date: Oct 09 2019 8:14PM

डॉ. यु. म. पठाण 

साधुं आणि संत।
 जन्म द्यावा जी कलींत॥ 
मागणें तें हेंचि, देवा। 
कृपा करी हों केशवा॥ 
संत दयाळा परम। 
तया साक्षी नारायण॥ 
जनी म्हणे, ऐसे साधु । 
तयापाशी तूं गोविंदू ॥

संतांची महती सांगताना जनाबाई म्हणतात, जगाचा उद्धार व्हायचा असेल तर जगात साधू-संत जन्मायला हवेत. ते जनसामान्यांना योग्य मार्गदर्शन करतील, योग्य उपदेश करतील. त्यामुळे भक्ती का करावी, नीती कशी करावी, हे लोकांना उमजेल. सत्कृत्य नि दुष्कृत्य नि दुष्कर्म यातला भेद त्यांना कळेल. मग ते दुष्कृत्यं बंद करतील. त्यामुळे या जगाला शुचिता कळेल किंवा पावित्र्य नांदेल. देवाच्या भक्तीत समाज रमेल नि अशा हरिभक्तांना मुक्ती मिळेल. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असं म्हणतात ते यासाठीच की नाही?