Responsive image

संतवाणी

By arun.patil | Publish Date: Sep 13 2019 8:34PM

डॉ. यु. म. पठाण 

दुर्योधना मारी। पांडवासी रक्षी हरी॥
पांडव वनवासीं जाये। तयापाठीं देव आहे॥
उणें न पडे तयांचें। काम पुरवी हो मनाचे॥
जनी म्हणे विदुराच्या। कण्या भक्षी हो प्रीतीच्या॥

ईश्वर दुष्टांचं निर्दालन करतो नि सज्जनांचं रक्षण करून त्यांचं कल्याण कसं करतो, याचं स्पष्टीकरण करताना जनाबाई काही पौराणिक दाखले देतात, ते असे ः परमेश्वरानं श्रीकृष्णाचा अवतार धारण करून दुर्योधनाचा निःपात केला व पांडवांचं रक्षण केलं. पांडव वनवासात असतानाही त्यानं पांडवांना सर्वतोपरी साहाय्य केलं. कुठल्याही गोष्टीची उणीव भासू दिली नाही व त्यांच्या सार्‍या विदुराघरच्या ‘कण्या’ही त्यानं गोड मानून घेतल्या. असा हा परमेश्वर परम दयाळू नि कृपाळू आहे, असं जनाबाई म्हणतात.