Responsive image

पहिला चहा आमचंपण ठरलंय!

By arun.patil | Publish Date: Sep 13 2019 8:34PM

प्रा. दिनेश डांगे

प्रियकर ः आय लव्ह यू!
प्रेयसी   ः आय लव्ह यू टू!
प्रियकर ः मग मुझसे शादी करोगी?
प्रेयसी    ः आमचं ठरलंय!
प्रियकर ः मग उगाच आमचा जीव का टांगणीला लावलास?
प्रेयसी    ः हूं! टाईमपाससाठी!
प्रियकर  ः मग तुमचं आणि काय काय ठरलंय?
प्रेयसी     ः जागावाटपाचंसुद्धा ठरलंय!
प्रियकर  ः मग रोजच्या रोज जागावाटपाची बाँब का चालू आहे?
प्रेयसी ः तसं आम्हाला नेमाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे आणि प्रतिनिवडणुकीप्रमाणे म्हणावे लागते.
प्रियकर ः तसे केल्याने काय होते?
प्रेयसी   ः आमच्यातील प्रेम पक्के होते. फेव्हिकॉल लावल्यासारखे होते.
प्रियकर ः जागावाटप म्हणजे तुला काय प्रसाद वाटप वाटले काय?
प्रेयसी   ः प्रसाद वाटपातसुद्धा लोक गोेंधळ घालतात. लांब कशाला घरकूल वाटप, भूखंड वाटप सगळीकडे गोंधळ हा करावाच लागतो.
प्रियकर ः एक विचारतो तुला प्रिये, तुमचं जर ठरलंय म्हणतेस, तर मग वधू-वर सूचक मंडळाच्या यादीत अजून तुझं नाव कसं? यादीतील वंचित वरांचे काय होईल?
प्रेयसी   ः वंचितांचे जे संचित असेल ते होर्ईल. मी आपली दोन्ही डगरीवर पाय ठेवून राहते बाबा!
प्रियकर ः शेवटच्या क्षणी मात्र तू जे करायचे ते करतेस! मग तुझ्या दादागिरीचा काय उपयोग?
प्रेयसी   ः तू आता माझी जास्तच चौकशी करू लागलास रे? जागा वाटप हा आमच्या दोघांच्यातील सिके्रट प्रश्न आहे. आम्ही तो कितीही ओपन केला तरी तुमच्यासारख्यांनी ओपन करायचे काम नाही. तिकडे बघा ना ते घड्याळवाले आणि हातवाले काय करतात ते!
प्रियकर ः अगं ते दोघे गप्पच आहेत. तू मात्र सारखी ‘आमचं ठरलंय’ ‘आमचं ठरलंय’ म्हणत असतेस म्हणून विचारले.
प्रेयसी ः तेच आमचं जागावाटपाचं ठरलंय. तिकडचे लोक पण खूश आहेत.
प्रियकर ः मग तिकडचे लोक काय म्हणाले?
प्रेयसी ः चालतंय की ! ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय एकच! असे ते म्हणाले.