Responsive image

प्रासंगिक : मानसिक आरोग्याचे मानसशास्त्र

By anirudha.sankpal | Publish Date: Oct 09 2019 8:14PM

डॉ. चंद्रकांत  कुलकर्णी


दहा ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हे या दिनाचे प्रयोजन आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याचा एकत्रित विचार करणे ही काळाची गरज आहे.

अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे मानसिक विकारांचे प्रमाण वाढले आहे. केवळ शहरे, महानगरांमधील नागरिकांमध्येच असे आजार दिसतात असे नाही, तर खेड्यांमध्येही ते दिसू लागले आहेत. मानसिक विकार वाढण्याची अनेक कारणे आहेत. माणसाचे शारीरिक आरोग्य बहुतांश मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते, असे मानसशास्त्र सांगते. मन निरोगी नसेल तर शरीरही निरोगी राहू शकत नाही. आपल्या आसपासच्या लोकांचे थोडे निरीक्षण केले तर कोणत्या ना कोणत्या समस्येमुळे माणसे दुःखी झालेली आढळतात; परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात या समस्या लोकांच्या लवकर लक्षात येत नाहीत. आल्या तरी वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे त्याकडे लक्ष देणे टाळले जाते. त्याचे भविष्यात गंभीर परिणाम दिसतात. त्यामुळे इतर शारीरिक आजार टाळायचे असतील तर त्यासाठी मनाच्या आरोग्याकडेही अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

मनोविकारावर प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध असूनही रुग्णामध्ये मानसोपचाराबाबत अनभिज्ञता आढळून येते. औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, वर्तन उपचार, संमोहन उपचार आदी उपचार पद्धती मनोरुग्णांसाठी उपलब्ध आहेत. बहुतांश मनोविकार योग्य वेळी नियमितपणे उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात; मात्र उपचाराबाबतच्या अज्ञानामुळे रुग्ण मनोविकारांवर उपचार घेण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. त्यामुळे मनोविकार व मानसोपचाराबाबत लोकशिक्षणाची आवश्यकता आहे. प्रगत उपचारांमुळे मानसिक आजारांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वीच्या काळी अशा आजारांचे निदान लवकर होत नसे. तसेच मानसिक आजार असणे हा मोठा कलंक समजला जात असे. एखादा माणूस वेडा असेल तरच त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले जाते असा समज होता. त्यामुळे मानसिक ताण, नैराश्य, मनातील इतर नकारात्मक भावना अशा गोष्टींसाठी मदत घेतली जात नसे; पण आता हे चित्र बदलले आहे. इतर आजारांप्रमाणेच मानसिक आजार हाही एक आजार आहे, असा दृष्टिकोन आता तयार होऊ लागला आहे. असे असले तरी देशात मनोविकार रुग्ण आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांचे तुलनात्मक प्रमाण खूप कमी आहे.

बर्‍याच वेळा मनोविकारांमध्ये आनुवंशिकता हा घटकही महत्त्वाचा ठरतो. आई-वडिलांपैकी एखाद्यास मनोविकार असेल, तर त्यांच्या मुलांनाही मनोविकार होण्याची शक्यता असते. प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, बेकारी, अपयश, विभक्त कुटुंब पद्धती, आर्थिक असुरक्षितता अशा अनेक घटनांमुळे मनोविकार होण्याची शक्यता वाढते. काही वेळा व्यक्तिमत्त्व दोष मनोविकाराला कारणीभूत ठरतात. 

मानसिक आजारातून होणारे परिणाम टाळण्यासाठी स्वमदतगट, सरकार अशा विविध पातळ्यांवर जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम व्हायला हवेत. त्याचप्रमाणे मानसिक नैराश्यातून आत्महत्या करणार्‍यांसाठी मदत देणारी केंद्रेही निर्माण होण्याची आवश्यकता आहे. मानसिक विकार निर्माण झाले की त्या व्यक्तीच्या वागण्यात बदल होऊ लागतात. त्याची संवादशैलीही बदलते. त्याचे परिणाम नातेसंबंधांवर होतात. अशा आजारातून त्या माणसामध्ये एखाद्या गोष्टीचे विशेषतः अमली पदार्थांचे, दारूचे व्यसन वाढते. मनावरील ताण कमी करण्यासाठी त्यांना व्यसन हा चांगला उपचार वाटतो. त्याचप्रमाणे मानसिक आजारामुळे त्या व्यक्तीची चिडचिडही वाढते. त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत तर व्यसनांचे प्रमाण आणखी वाढेल. कौटुंबिक वाद विवादांचे प्रमाणही वाढेल. नातेसंबंधातील संवाद कमी होत जाईल. पती-पत्नीने घटस्फोटाचा मार्ग अवलंबल्याने त्यांच्या मुलांच्या भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतील. मुलांची पालकांपासून ताटातूट झाल्याने त्यांच्या आयुष्यातील प्रश्न वाढतील. मुलामध्ये वाढणारे मानसिक आजार लक्षात घेऊन आता पालकांनाही आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुकरण करणे ही मुलांची प्रवृत्ती असते. आपल्या पालकांबरोबर किंवा इतरत्र दारू पिणे, सिगारेट ओढणे अशी व्यसने करणे त्यांना प्रतिष्ठेचे वाटायला लागते आणि त्याचे भविष्यात गंभीर दुष्परिणाम होतात. हे टाळण्यासाठी पालकांनी जबाबदार वर्तन केले पाहिजे. आपल्याकडे बालमानसोपचारतज्ज्ञांचीही कमतरता आहे. ती वाढवण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2020 पर्यंत हृदयरोगानंतर नैराश्य किंवा डिप्रेशन हा मनोविकार दुसर्‍या क्रमांकावर असेल, वाढत्या ताणतणावामुळेच नैराश्यासारखे मनोविकार आगामी काळात वाढत जाणार आहेत. पूर्वी प्रामुख्याने आर्थिक कमतरता किंवा दारिद्य्र यामुळे या विकाराला बळी पडण्याचे प्रमाण अधिक होते. बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. डिपप्रशनसारख्या मनोविकारावर त्वरित उपचार घेणे आवश्यक असते; अन्यथा आजाराची तीव्रता वाढत जाते.हिंदू राष्ट्राची स्थापना करणाऱ्या नित्यानंदविरोधात इंटरपोलची नोटीस


महाविकास आघाडीसाठी सुरवातीला मीच पुढाकार घेतला : दलवाई


तान्हाजी चित्रपटात ‘या’ गावचा उल्लेख न केल्याने ग्रामस्थ संतप्त


पुण्यातील नाईट लाईफवर आदित्य ठाकरेंकडून 'पुणेरी'उत्तर!


गोवा : वाळू व्यवसायिकांनी घेतली दिगंबर कामत यांची भेट


हिंगोली : तीन वर्षाच्या चिमुकलीचा खून करणार्‍या पित्यास जन्मठेपेची शिक्षा


धुळ्यात संशयास्पद मृत्यू, हात पाय बांधून विहिरीत टाकले


३० वर्षांपूर्वी करत होती 'त्याला' डेटिंग; ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न!


ओबीसी आयोगाला केंद्राची मुदवाढ


दापोली : मुरूड समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा