Responsive image

पहिला चहा : बापू फक्त आमुचे...

By anirudha.sankpal | Publish Date: Oct 09 2019 8:14PM

प्रा. दिनेश डांगे

बापूंच्या समाधीवर। गर्दी गोळा झाली। हौसे नवसे गवसे। जयंतीच्या मुहूर्तावर। अवघि गोळा झाली। कुणी फुले समाधीवर। वाहिली। कुणी नुसतेच। हात जोडले। कुणी कॅमेर्‍याकडे पाहिले। डोळ्यातले भाव। लपविताही न लपले। पेपरात दुसर्‍या दिवशी। फोटोवर फोटो आले। म्हणणे प्रत्येकाचे एकच। बापू फक्त आमुचे। बघुनि सारे नाटक। समाधीतले बापू हसले। शेजारी बापूंची। तिन्ही माकडे। हे सारे पाहूनि। झाली जागच्या जागी लाकडे। आज तयांना कळले। बापूंचे ते वचन। बुरा मत सुनो बुरा मत देखो। और बुरा मत बोलो। बापूंचे वचन जे होतेे। तंतोतंत खरे ठरले। पाहूनि हे सारे। समाधीचे दगडही। हादरले। कुणी म्हणे चष्मा बापूंचा। आहे हो आमुचा। स्वच्छतेची द़ृष्टी। दिली आम्हीच जगाला। तोच घालूनि चष्मा। पाहतो आम्ही विश्वाला। विश्वात शोभूनि राहे। आता चष्मा हा बापूंचा। कुणी धरले हाताला। पूज्य बापूंच्या। बापू आमचेच हो आमुचे। आम्हीही बापूंचे। बापूच चालविती आम्हा।  पक्ष आमचा हो बापूंचा। बापू असती हो आमुचे। नाही अन्य कुणाचे। पाहूनि बापू गलबलले। अश्रू डोळ्यात जमले। हयात असताना जितुके। प्रेम नाही मिळाले। परलोकी गेल्यानंतर। प्रेमाचे पूर किती आले। ग्लोबल वॉर्मिंगचे। परिणाम अनुभवले। बापूंच्या तीन माकडांनी। डोळे आता उघडले। म्हणाले बापू तुमचा। किती गोड गैरसमज झाला। जो आला तो तुमचा। कसा होऊनिया गेला। बापू अजून पुढे। काय काय वाढुनिया ठेवले। कुणालाही न ठावे। समाधीवर जे जे येतील। तयांना आपुलेच समजावे। वैष्णवजन आहोत आपण। निंदक असो वा प्रशंसक। दोन्ही आपुलेच समजावे। जयंती दिवशी सारे। सहन करीत जावे। म्हणोनि डोळे आपुले। बंद करोनि घ्यावे। दिसो नयेत समोरचे। भक्त कसले कसले। त्याहीपेक्षा भाव त्यांच्या मनीचे। वाचावयास मिळो नये। त्यांच्या श्रद्धेचे। सत्यरूप। द़ृष्टीस ना पडावे। बापूंच्या समाधीवर। जयंतीस गर्दी किती ही झाली। बापूंवरील प्रेमास भरती किती ही आली! धुळ्याच्या सुषमा राजपूत यांचे ग्रीसच्या पंतप्रधानांकडून कौतुक 


हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक


रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती