Responsive image

संतवाणी : ‘जोडोनी’ ठेविलें, तेंचि देई

By santosh.kanmuse | Publish Date: Mar 27 2020 7:35PM

डॉ. यु. म. पठाण 

जरी तुम्हां उबग आलासे दीनाचा। 
अभिमान कोणाचा कोणाकडे॥
तारूं जाणे उदक आपण वाढविलें। 
हें तुम्हां न कळे कैसें देवा॥
यापरि पोसणा तुमचे उच्छिष्टाचा। 
भार तयाचा तुम्हां झाला॥
कर्ममेळा म्हणे जोडोनी ठेविलें। तेंचि वहिलें मज देई॥

संत कर्ममेळा ईश्वराची वेगवेगळ्या प्रकारे विनवणी करताना म्हणतात : “देवा, माझा उद्धार करावा, यासाठी मी वेळोवेळी विनंती करीत आहे, यामुळे तुम्हांला माझा उबग तर आला नाही ना? तुम्हीच मला पोसलंत. आता तुम्हाला माझा ‘भार’ तर वाटत नाही? मी तुम्हाला दुसरं काहीही मागत नाही. माझे वडील चोखामेळा यांनी तुमची भक्ती करून पुण्याई मिळविली, तिचाच वारसा मला आहे, याचा तरी विचार करून तुम्ही मजवर कृपा करावी.”var UNIQUE_ARTICLE_ID ='4741'; var SECTION_TAGS = 'pudhari santwani, father, Chokhamela, earned, devotion, Pune, inheritance, mine'; var ARTICLE_TITLE = 'संतवाणी : ‘जोडोनी’ ठेविलें, तेंचि देई';