Responsive image

पहिला चहा : कोरोना विश्वचषक!

By santosh.kanmuse | Publish Date: Mar 27 2020 7:35PM

प्रा. दिनेश डांगे

काल्पनिक भयपटातील विनाशाचा थरार पाहून माणूस घाबरल्यावाचून राहत नाही. कमकुवत हृदयाच्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहू नये, असे अगोदरच सांगितले जाते. खरे तर घरीसुद्धा अशा लोकांनी एकटे असताना असला चित्रपट पाहू नये. 65 वर्षांच्या वरील लोकांची तर फारच काळजी घ्यावी लागते. कारण, सध्याचा कोरोना हा एखाद्या भयपटापेक्षा थरारक आहे. कोरोनाचा सध्या विश्वचषक सामना सुरू झाला आहे. त्याला हा ‘कसोटी’ सामना खेळण्याची प्रेरणा बहुधा क्रिकेटपासूनच मिळाली असावी. 1) जगाला खिळवून ठेवण्याची क्षमता क्रिकेटमध्ये आहे. कोरोनानेसुद्धा जगाला खिळवून ठेवले आहे. 2) क्रिकेटमध्ये ईर्ष्या असते. कोरोनासुद्धा ईर्ष्येला पेटलाय. 3) जास्तीत जास्त धावा काढणे हे क्रिकेटमध्ये उद्दिष्ट असते. कोरोनानेसुद्धा जास्तीत जास्त धावा काढायला सुरुवात केलीय. चौकार आणि षटकारांची बरसात त्याने सुरू केली आहे. 4) महामारीचा विश्वचषक त्याच्या नावाने सुरू असून खेळ एकतर्फी सुरू आहे. 5) मैदानही त्याचेच आणि पंचही त्याचाच. 6) क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडविणे, धूळ चारणे, कंबरडे मोडणे असे शब्दप्रयोग वापरले जातात; पण कोरोना तर प्रतिस्पर्धी मानवजाती संघाचे नामोनिशाण मिटवू पाहत आहे. 7) चेंडूपण तो स्वत:च टाकतोय आणि फलंदाजीपण स्वत:च करतोय. 8) त्याला हजारो हात आहेत आणि पायही हजारो आहेत. 9) ऑक्टोपस जातीतला तो दिसतोय. 10) त्याचा हा जीवघेणा सामना बघायला कुणीही बाहेर पडायला तयार नाही. 11) लोक टीव्हीसुद्धा बंद करून बसलेत. चुकून टीव्हीतून तो बाहेर पडायचा! आणि डोक्यात बॅट घालायचा! इतकी त्याची दहशत पसरलीय. 12) लोकांनाही सरकारने सूचना दिलीय. तुम्ही काम काहीही करू नका. घरी स्वस्थ बसा; पण आगाऊपणा काही करू नका... तर ही झाली कोरोना विश्वचषकाची बारा वैशिष्ट्ये! कोरोनाचा हा जीवघेणा सामना कधी संपणार, असे फोन सरकारला वारंवार येत आहेत. त्यावर तो कोरोना खेळून खेळून जेव्हा दमेल आणि मान टाकेल, तेव्हा त्याचा खेळ संपेल, तोपर्यंत तुम्ही तुमच्या तुमच्या घरात माना टाका, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. जर तुम्ही रस्त्यावर येऊन मान बाहेर काढली तर मानगुटीला धरून आत टाकण्यात येईल, असा प्रेमाचा इशाराही सरकारने दिला आहे.var UNIQUE_ARTICLE_ID ='4742'; var SECTION_TAGS = 'pudhari pahila chaha, Corona, World Cup, match, currently, underway'; var ARTICLE_TITLE = 'पहिला चहा : कोरोना विश्वचषक!';